बीएमएस सत्र ६ परीक्षेचा निकाल जाहीर; २०२३ च्या उन्हाळी सत्राचे ८६ निकालांची घोषणा

Mumbai: मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या अंतिम वर्षाच्या एप्रिल २०२३ मध्ये संपन्न झालेल्या उन्हाळी सत्राच्या वाणिज्य विद्याशाखेच्या तृतीय वर्ष (Third Year BMS- Semester 6) बीएमएस सत्र ६ या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य विद्याशाखेच्या बीएमएस सत्र ६ च्या या परीक्षेसाठी १५ हजार ५१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी, ८ हजार ११० विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी १५ हजार ३४६ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ (Appeared) झाले होते.

(वाचा : भारतातील वकिलांसाठी हे आहे सर्वोत्तम करिअरचे पर्याय…)

वाणिज्य विद्याशाखेच्या बीएमएस सत्र ६ च्या या परीक्षेसाठी १७० विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. सदर परीक्षेमध्ये ३ हजार २०० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे, यावर्षी बीएमएस सत्र ६ चा निकाल ७१.७१ टक्के लागला असल्याचे मुंबई विद्यापीठाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.

विद्यापीठाने आजपर्यंत २०२३ च्या उन्हाळी सत्राचे एकूण ८६ निकाल जाहीर केले आहेत. या सर्व परीक्षांचे निकाल परीक्षेचे निकाल विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://www.mumresults.in/ प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

(वाचा : Engineering Degree: या संस्थांमध्ये मिळेल जेईईच्या मार्कांविना इंजिनिअरिंग आणि संबंधित अभ्यासक्रमांना प्रवेश)

Source link

BMS ResultBMS Sem 6Exam Results 2023exam results announcedexam results NewsMU Result 2023mumbaimumbai universityMumbai University ExamResults 2023
Comments (0)
Add Comment