ना आदिपुरुष ना सत्यप्रेम की कथा, या दोन सिनेमांनी केली तुफान कमाई, एक तर आहे मराठी सिनेमा

मुंबई- आशय चांगला असेल तर चित्रपट चालतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मग तो कोणत्या भाषेत आहे हे महत्त्वाचे नाही. असेच एक उदाहरण अलीकडे पाहायला मिळत आहे. ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’ कडून खूप अपेक्षा होत्या पण तो प्रेक्षकांना प्रभावित करू शकला नाही. त्याचबरोबर ‘सत्यप्रेम की कथा’ सिनेमाच्या कलेक्शनची गतीही मंदावलीच आहे. दरम्यान, पंजाबी आणि मराठी भाषेतील असे दोन चित्रपट आहेत जे मात्र बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहेत.

आम्ही ज्या दोन चित्रपटांबद्दल बोलतोय त्यातील पहिला चित्रपट म्हणजे ‘कॅरी ऑन जट्टा ३.’ हा पंजाबी भाषेतील चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित झाला होता. गिप्पी ग्रेवाल, सोनम बाजवा, रवनीत कौर ग्रेवाल, जसविंदर भल्ला, बिन्नू ढिल्लन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला पहिल्या दिवसापासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘कॅरी ऑन जट्टा ३’ चे दिग्दर्शन स्मीप कांग यांनी केले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १० कोटी १२ लाखांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने १० कोटी ७२ लाखांची कमाई केली.


चांगली सुरुवात केल्यानंतर चित्रपटाला नंतरच्या दिवसांमध्येही चांगला प्रतिसाद मिळू लागला. चित्रपटाने शनिवारी १२.३२, रविवारी १३.४० आणि सोमवारी ६.४० कोटींचा व्यवसाय केला. चित्रपटाचे एकूण कलेक्शन ५३ कोटींहून अधिक झाले आहे.


पंजाबी चित्रपटाशिवाय दुसरा मराठी चित्रपट म्हणजे ‘बाईपण भारी देवा.’ केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बडेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. उत्कृष्ट अभिनय आणि कथेने सजलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे अखंड प्रेम मिळत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ११ कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.


काय आहे सिनेमाची कथा

‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारलेला आहे. प्रत्येकीच्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करत आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न त्या करताना दिसत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड कायम करत ‘वाळवी’ चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला. ‘बाईपण भारी देवा’ ने पहिल्या तीन दिवसातच तब्बल ६ कोटी ४५ लाखांची कमाई केली आहे. जी यापूर्वी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या कोणत्याही चित्रपटाला जमली नव्हती. ‘वाळवी’ ने पहिल्या तीन दिवसांत फक्त १ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने पहिल्या दिवशी १ कोटीची कमाई केली दुसऱ्या दिवशी २ कोटी ४५ लाखांची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी ३ कोटींची कमाई केली.

दिग्दर्शक समीर विद्वांसचा हिंदीत डेब्यू, कसा आहे ‘सत्यप्रेम की कथा’चा पब्लिक रिव्हू?



Source link

adipurushbaipan bhaari devabaipan bhaari deva box office collectioncarry on jatta 3satyprem ki katha
Comments (0)
Add Comment