National Exit Test थेट पुढच्या वर्षी; केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी केली घोषणा

NExT Exam Updates: वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पीजी (Post Graduation) साठी दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या NEET PG परीक्षेऐवजी NExT (National Exit Test) ही परीक्षा घेतली जाणार आहे. नेक्स्ट परीक्षेतील गुणांच्या आधारे एमडी, एमएसकरिता प्रवेश दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

याशिवाय एमबीबीएस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे. त्याशिवाय ते भारतात Medical Practice करू शकणार नाहीत. यासोबतच, परदेशातून वैद्यकीय पदवी घेतलेल्या MBBS उमेदवारांनाही भारतात Medical Practice करण्यासाठी ही परीक्षा देणे बंधनकारक असणार आहे.

नॅशनल मेडिकल कमिटी (NMC) ने अगोदर जाहीर केलेल्या निर्णयानुसार, नेक्स्टची परीक्षा २०१९ मध्ये प्रवेश घेतलेल्या MBBSच्या विद्यार्थ्यांपासून सुरु करण्यात येणार होती. मात्र, गुरुवार, ६ जुलै २०२३ ला केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचे मोठे विधान समोर आले आहे.

२०१९ च्या एमबीबीएससाठी नॅशनल एक्झिट टेस्ट (NEx T) घेता येणार नाही. त्यामुळे, ती परीक्षा पुढील बॅचसाठी म्हणजेच २०२० च्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांपासून सुरु होणार आहे. म्हणजेच २०२० ची एमबीएस विद्यार्थ्यांची नेक्स्ट परीक्षा देणारी पहिली बॅच ठरणार आहे.

Source link

Doctormbbsmdmedical entrancemsnational exit testnational medical commissionnextnext 2023nmc
Comments (0)
Add Comment