माझगाव डॉकमध्ये विविध विभागातील तब्बल ४६६ जागांवर Apprenticeship; २६ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Mazagon Dock Ltd 2023: Mazagon Dock Limited ने व्यवसाय प्रशिक्षणार्थी (Apprenticeship) पदांसाठी ४६६ जागा उपलब्ध असल्याची जाहीरात प्रसिद्ध केली आहे. या जागांच्या भरतीसाठी उत्सुक आणि पात्र उमेदवारांना या जागांसाठी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. सदर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना २६ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

ड्राफ्ट्स्मेन (मेकेनिकल), इलेक्ट्रिशियन, फिटर, पीप फिटर, स्ट्रक्चरल फिटर, वेल्डर, आरएसी, सी ओ पी ए, कारपेंटर, रिंगर, वेल्डर अशा विविध जागांसाठी ही व्यवसाय प्रशिक्षणार्थीसाठी भरती असणार आहे.

‘ग्रुप क’ – इयत्ता दहावी उत्तीर्ण, ‘ग्रुप ख’ – आय टी आय परीक्षा उतीर्ण, ‘ग्रुप ग’ – इयत्ता आठवी उत्तीर्ण अशा वेगवेगळ्या गटात आरक्षणाच्या नियमांच्या नुसार ही भारती होणार असून याबद्दलची तपशीलवार माहिती जाहिरात देण्यात आली आहे.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये व्यवसाय प्रशिक्षणार्थीना त्यांच्या ट्रेंड आणि कामाच्या स्वरूपानुसार प्रत्येक महिन्याला Stipend दिला जाणार आहे.

प्रशिक्षणार्थींच्या ट्रेंडनुसार उपलब्ध जागा, शैक्षणिक पात्रता, आरक्षण, प्रशिक्षण अवधी, प्रतिमाह दिला जाणारा Stipend आणि वयोमर्यादा याबद्दल तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने प्रकाशित केलेली जाहिरात पहावी.

असा करा अर्ज:

० उमेदवारांना या भरती संबंधित अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे.
० इच्छुक उमेदवारांनी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन अर्ज सादर करायचा आहे.
० संकेत स्थळावरती Career किंवा Online Recruitment वर क्लिक करावे.
० Apprentice या शीर्षकावर क्लिक करून कार्यवाही पूर्ण करावी.

अर्जाचे शुल्क :

सदर भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना १०० रुपये अधिक बँकेचे चार्सेस (दोन्ही विनापरतावा) आणि इतर आरक्षणाच्या

Source link

apprenticeshipMazagon Doc Recruitment 2023mazagon dockmazagon dock bharti 2023mazagon dock limited bharti 2023mazagon dock recruitmentmazagon dock recruitment 2023mazagon dock shipbuilders limitedmdl bhartimazagon dock ltd.mdl recruitment 2023
Comments (0)
Add Comment