फॉरेन्सिक सायन्स आणि क्रिमिनोलॉजी (Forensic Science and Criminology) :
NEET UG मध्ये नापास झालेले उमेदवार फॉरेन्सिक सायन्स आणि क्रिमिनोलॉजीचाही अभ्यास करू शकतात. देशभरात अनेक विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगली नोकरीही मिळते.
बी एससी बायोलॉजी (B.Sc. Biology) :
हे विद्यार्थी बीएससी बायोलॉजी (जीवशास्त्र) विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करून, त्यानंतर, एमएससी आणि पीएचडी करून असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करू शकतात. बीएससी बायोलॉजी केल्यानंतर पीएचडी करणाऱ्या उमेदवारांसाठी दरवर्षी विविध विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांची भरती केली जाते. तिथे तुम्हाला काम करण्याची समाधी मिळू शकते.
बीएससी न्यूट्रिशन (B.Sc. Nutrition) :
NEET UG मधील अनुत्तीर्ण विद्यार्थी कोणत्याही चांगल्या महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून B.Sc. Nutrition चा अभ्यासक्रम करू शकतात. बीएससी न्यूट्रिशनचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगली नोकरीही मिळते. शिवाय, ते ऑनलाइन कन्सल्टन्ट म्हणूनही काम करू शकतात.
बी.फार्मा (B Pharm) :
NEET UG परीक्षेत नापास झाल्यानंतर किंवा MBBS मध्ये प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थी B.Form हा कोर्स करू शकतात. अनेक संस्थामध्ये हा अभयस्करां चार वर्ष कालावधीसाठी उपलब्ध असतो. आजच्या युगात, बी फार्मा पदवीधर उमेदवारांना अनेक वैद्यकीय कंपन्या किंवा औषध कंपन्या नियुक्त करतात. याशिवाय उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी स्वतःचे मेडिकल स्टोअरही उघडू शकतात.
बीएससी नर्सिंग (B.Sc. Nursing)
या आभ्यासक्रमासाठी विद्यार्थी कोणत्याही संस्था किंवा विद्यापीठातून बीएससी नर्सिंग कोर्स करू शकतात. अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालये स्वतःची प्रवेश परीक्षा देऊन B.Sc. नर्सिंगमध्ये प्रवेश देतात.
बायोटेक्नोलॉजिस्ट जैवतंत्रज्ञ (Biotechnologist) :
NEET UG मध्ये कमी गुण मिळवणारे उमेदवार किंवा अनुत्तीर्ण उमेदवार देखील बायोटेक्नॉलॉजिस्टचा कोर्स करू शकतात. हे अभ्यासक्रम अनेक विद्यापीठे देतात. बायोटेक्नॉलॉजिस्टचा अभ्यास केल्यानंतर उमेदवारांना चांगली प्लेसमेंटही मिळते.