महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनीमध्ये २६ जागांसाठी पदभरती; २७ जुलैपर्यंत भरता येणार अर्ज

MSEB Recruitment 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Transmission Company Limited) मध्ये विविध पदांच्या २६ जागांसाठी भरती असून, पात्र उमेदवारांना २७ जुलै २०२३ पर्यत अर्ज करण्याची मुभा आहे.

पदभरतीचा तपशील, पात्रता आणि अटी :

एकूण रिक्त जागा : २६

१. मुख्य अभियंता (Chief Engineer) : ०४ जागा

  • इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंग/टेक्नोलॉजी मधील पदवी पर्यतचे शिक्षण (Bachelor’s Degree in Electrical Engineering)
  • शिवाय १५ वर्षांचा अनुभव आवश्यक

२. अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) : १२ जागा

  • इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंग/टेक्नोलॉजी मधील पदवी पर्यतचे शिक्षण (Bachelor’s Degree in Electrical Engineering)
  • शिवाय, १२ वर्षांचा अनुभव आवश्यक

३. महाव्यवस्थापक (General Manager) : ०२ जागा

  • फायनसान्स, अकाउंटिंग, ऑडिट क्षेत्रातील किमान दहा वर्षांचा अनुभव आत्यावश्यक.

४. मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी (Jt. chief Industrial Relation officer) : ०१ जागा

  • विधी विषयातील पदवीधर
  • मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
  • औद्योगिक संबंध क्षेत्रातील ६ ते १२ वर्षांचा अनुभव आवश्यक

५. उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) : ०२ जागा

  • २ वर्षाचा पार्ट टाइम किंवा ३ वर्षाचा फुल टाइम मॅनेजमेंट पदवीधर
  • किमान दहा वर्षांचा अनुभव असणे अत्यंत आवश्यक

६. सहाय्यक महाव्यवस्थापक (Asst. General Manager) : ०२ जागा

  • २ वर्षाचा पार्ट टाइम किंवा ३ वर्षाचा फुल टाइम मॅनेजमेंट पदवीधर
  • किमान ९ वर्षांचा अनुभव असणे अत्यंत गरजेचे.

७. सहाय्यक महाव्यवस्थापक (Asst. General Manager) : ०३ जागा

  • सीए किंवा आयसीडब्ल्यूए पूर्ण झालेले उमेदवार
  • किमान ८ वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक.

(वरीलपैकी कोणत्याही पदाकरिता अर्ज करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात आणि त्यातील नियम काळजीपूर्वक वाचावे.)

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज शुल्कांविषयी :

– सदर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ‘Maharashtra State Electricity Distribution Company Limited Mumbai’ या नावाने डीडी (Demand Draft) स्वरूपात भरणे गरजेचे आहे.
– खुल्या प्रवर्गातील उमेदवार : ७०८ रुपये + CGST आणि SGST
– आरक्षणांतर्गत अर्ज करणारे उमेदवार : ३५४ रुपये + CGST आणि SGST
(अधिक माहिती PDF मध्ये उपलब्ध)

महत्त्वाच्या तारखा :

  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : २७ जुलै २०२३
  • निवड प्रक्रिया अंदाजे ऑगस्ट २०२३ मध्ये मुंबईत आयोजित केली जाईल. (याबद्दल निवड झालेल्या उमेदवाराला कळवले जाईल)

Source link

Government jobmaharashtra governmentmaharashtra state electricity boardmsebmseb 2023mseb recruitmentmseb recruitment 2023Recruitment 2023sarkari naukriमहाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ
Comments (0)
Add Comment