मागील यावर्षी, ३ ऑगस्ट २०२२ ला कॅट परीक्षेसाठी आवश्यक नोंदणी प्रक्रियेला (Registration Process) ला सुरुवात झाली होती. रविवार, २७ नोव्हेंबर २०२२ ला कॅटची परीक्षा घेण्यात आली होती. तर, २१ डिसेंबर २०२२ ला या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता.
बर्याच पत्रकारांनी केलेल्या दाव्यानुसार, यावर्षी ही सामायिक प्रवेश परीक्षा २६ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, Indian Institutes of Management (IIM) च्या वतीने अद्यापही याबाबत कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नाही.
(वाचा : NEET UG Failures: NEET मध्ये अपशय मिळाल्याने होऊ नका हताश, करिअरचे आहेत अनेक पर्याय, जाणून घ्या)
कॅट २०२३ परीक्षेची तारीख, अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप आणि रजिस्ट्रेशनला केव्हा सुरुवात होणार..? या प्रश्नांनी अनेक विद्यार्थ्यांना काळजी लागली आहे. तर, IIM च्या वतीने लवकरच यासंदर्भातील अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
या परीक्षेच्या दरवर्षीच्या ट्रेंडपाहता, CAT 2023 चे अर्ज ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची शकयता आहे. नोंदणीची ही ऑनलाइन प्रक्रिया साधारणपणे एक महिना सुरू राहणार असते. ही परीक्षा देशभरातील सुमारे ३०० परीक्षा केंद्रांवर घेतली जाऊन, देशभरातील २० IIM’s मधील MBA अभ्यासक्रमांना या मार्कांच्या आधारे प्रवेश दिला जातो.
याशिवाय, CAT परीक्षेच्या आधारे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), MDI गुरुग्राम, SP जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SPJIMR), इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी (IMT) आणि गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (GIM) मध्येही प्रवेश दिला जातो.
अशा प्रकारे तुम्ही CAT 2023 परीक्षेसाठी अर्ज करू शकता:
- सर्व प्रथम CAT 2023 अधिकृत वेबसाइटवर जा.
- यानंतर Registration for CAT 2023 या लिंकवर क्लिक करा.
- रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून, तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळवा.
- लॉगिन करून आवश्यक सर्व माहिती अचूक भरून तुमचा फॉर्म पूर्ण करा.
- संबंधित कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर फी भरा आणि सबमिट करा.
- फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी ती तुमच्याकडे ठेवा.
(वाचा : NExT Exam Updates: National Exit Test थेट पुढच्या वर्षी; केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी केली घोषणा)