सत्कार्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक, गुंतवणूक करावी. या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी,पूजा पाठ करावेत. स्तोत्रपठणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून या महिन्यात अधिकाधिक स्तोत्रपठण करावे. या महिन्यात श्रीमद भागवत गीतेतील पुरुषोत्तम महिन्याचे महामात्य, श्री रामकथेचे पठण, विष्णु सहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील चौदाव्या अध्यायाचे रोज अर्थासहित पठण करावे.
या महिन्याची कथा भगवान विष्णू, भगवान नृसिंह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अवताराशी संबंधित आहे. त्यामुळे या महिन्यात या देवांची मनोभावे पूजा करावी. जर तुम्हाला पठण करता येत नसेल किंवा रोजच्या कामकाजाच्या धावपळीमुळे वेळ मिळत नसेल तर तुम्ही ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्राचा जप दररोज १०८ वेळा करावा.
या संपूर्ण महिन्यात अन्न फक्त एक वेळ घेतले पाहिजे, जे आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून चांगले असेल. या महिन्यात दिपदानाला खुप महत्व आहे. या महिन्यात दान आणि दक्षिणेचे कार्य करणे पुण्याचे मानले जाते. पुरुषोत्तम महिन्यात स्नान, पूजा, अनुष्ठान आणि दान केल्याने विशेष फळ मिळते आणि सर्व प्रकारचे त्रास दूर होतात.
गहू, तांदूळ, मूग, तीळ, वाटाणा, राजगिरा, काकडी, केळी, आवळा, दूध, दही, तूप, आंबा, खरपूस, पिंपळ, जिरे, कोरडे आले, खडे मीठ, चिंच, सुपारी, फणस. तुती, मेथी पदार्थांचे सेवन करावे. या महिन्यात प्रवास करणे, भागीदारीची कामे करणे, मुकदमा करणे, बियाणे पेरणे, झाडे लावणे, दान करणे, जनहिताची कामे करणे, सेवा कार्य करणे यात दोष नाही.