ही पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिलं, ‘नि: शब्द. काही घटना आयुष्यात घडतात त्या फक्त आनंद व्यक्त करण्यासाठी. हे सगळं अनाकलनीय आहे. त्यावर निर्विवाद वर्चस्व आहे ते. मायबाप प्रेक्षकांचं. त्या परमेश्वराचा आशिर्वाद. हा सिनेमा आता आमचा राहीला नाही. तो प्रेक्षकांचा झाला आहे. अनेक विक्रम प्रेक्षकांच्या नावे या सिनेमाने निर्माण करावेत हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया.’ केदार यांनी शेअर केलेल्या पोस्टनुसार, या चित्रपटाने फक्त १० दिवसात तब्बल २६ कोटी १९ लाखांची कमाई केली आहे. वेबसाइटच्या माहितीनुसार हा चित्रपट केवळ ५ कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर इतर चित्रपटांना मागे टाकत या चित्रपटाने तब्बल २६ कोटींचा पल्ला गाठला आहे.
यावर नेटकऱ्यांनीदेखील निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला आहे. एका नेतकऱ्याने लिहिलं, ‘बजेट ५ कोटी आणि कमवले बघा किती.’ तर दुसऱ्या युझरने लिहिलं, ‘कालच पाहिला चित्रपट, परत परत बघावस वाटत. खूप सुंदर चित्रपट आणि चालू परिस्थिती सांगणारा. खूप अभिनंदन.’ चाहते केदार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.