अधिक महिन्यात जावयाला वाण का देतात? चांदीची भेटवस्तू देण्याचे महत्व जाणून घ्या

असे होते जावयाचे आदरातिथ्य

या महिन्यात सासुरवाशीणीचे आई वडील जावयला घरी बोलवून त्यांना रितसर गंध वगैरे लावून ओवाळतात. पंचपक्वाने त्यांचा मानपान केला जातो. जावयाला अधिकमासाचं वाण दिलं जातं. हिंदू धर्मात मुलगी-जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात. म्हणून जावयाला तुपात तळलेले तेहतीसच्या पटीत अनारसे देतात. एका चांदीच्या अथवा तांब्याच्या ताम्हणात अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावयाला देतात. अनारसे ऐवजी बत्तासे, म्हैसूरपाक, वगैरे जाळीदार पदार्थ द्यावयाचे असतात, यांची संख्या ३३ असावी. या महिन्यात नारळ, सुपाऱ्या, फळे यांसारख्या वस्तू सुद्धा तेहतीसच्या पटीत घेऊन दान करतात.

३३ संख्यालाच इतके महत्व का

वसिष्ठ सिद्धांताप्रमाणे अधिक महिना हा ३२ महिने १६ दिवस, आणि ८ तासांच्या नंतर म्हणजे सुमारे ३३ महिन्यांच्या नंतर येतो. या ३३ महिन्यांसाठी म्हणून ३३ वस्तूंचे दान केले जाते. याचा उल्लेख अनेकदा तीस – तीन असा केला जातो. कारण पूर्ण महिना हा ३० च दिवसांचा असतो. त्यामुळे एखादा नेम / व्रत दिवसातून एकदाच करणार असाल तर शेवटचे ३ दिवस ते दिवसातून दोन वेळा करून ३३ पूर्ण करावे लागतात. तसंच ३३ ही संख्या अधिक मासामध्ये महत्त्वाची आहे. ३३ कोटी देव आसल्याने ३३ ही संख्या महत्वाची आहे.

जावयाला चांदीच्याच वस्तूची भेट देण्याचे महत्व

लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय आहे, त्यामुळे जावयाला चांदीच्याच भेटवस्तू दिल्या जातात. धार्मिक दृष्टिकोनातून चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो. मान्यतेनुसार, चांदीची उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यांतून झाली आहे अशी मान्यता आहे. चांदीचा संबंध प्रेमाचा कारक शुक्र, धनाचा आणि मनाचा कारक चंद्राशी आहे असे म्हटले जाते. चांदी शरीरातील पाणी आणि घटक नियंत्रित करते. यासोबतच शरीरातील समस्या दूर करण्यासाठीही याचा उपयोग होतो. मुलीचं आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक महिन्यात जावयाला चांदीच्या वस्तू भेट देतात.

चांदिचे निरंजन देण्याचे महत्व

देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशिर्वाद मिळविण्यासाठी दिप दानाला महत्त्व आहे. यामुळे जावयाला चांदीचे निरंजन नक्की द्या. जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आशीवार्द मिळतात. जेव्हा तुम्ही चांदीचं निरंजन जावयाला देतात तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू आणि केतू ग्रहांचे वाईट परिणामही कमी होतात असे सांगितले जाते.

Source link

adhik maas 2023adhik mahina 2023adhik mahinyat javayache mahtvaimportance of silver gift to the son in law at adhik maasअधिक महिना २०२३अधिक महिन्यात जावयाला महत्व
Comments (0)
Add Comment