नवी दिल्ली : iPhone 13 Offers : काही दिवसांतच अॅमेझॉन प्राइम डे सेलला सुरुवात होणार आहे. यंदा १५ आणि १६ जुलैला हा सेल असणार असून यामध्ये एकापेक्षा एक ऑफर्स असणार आहेत. दरम्यान याआधीच ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर Apple च्या आयफोन १३ वर ग्राहकांना अफलातून सवलत मिळत आहे. iPhone 13 लाँच होऊन आता २ वर्षे झाली असून सध्या आयफोन १४ हा लेटेस्ट फोन आहे. दरम्यान अशामध्ये Flipkart वर थेट २० हजारांना हा फोन विकत घेण्याची संधी आहे. चला तर नेमकी ऑफर जाणून घेऊ…
iPhone 13 2021 मध्ये Apple ने iPhone 13 pro आणि Mini सोबत लाँच केला होता. त्यानंतर हा स्मार्टफोन ७९,९०० रुपये किमतीत उपलब्ध करण्यात आला. सध्या, तुम्ही Flipkart वरून हा फोन अवघ्या २०,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता आणि तब्बल ५८ हजारांपर्यंत वाचवू शकता. तर ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर, आयफोन १३ सध्या ६०,९९९ रुपयांना सूचीबद्ध आहे. HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर ग्राहकांना २ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. यानंतर फोनची किंमत ५८,९९९ रुपये होईल. याशिवाय, तुम्ही ३८,००० रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट ऑफर मिळणार आहे. जर तुमचा जुना स्मार्टफोन चांगल्या स्थितीत असेल, तर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन फक्त २०,९९९ रुपयांमध्ये फोन खरेदी करू शकता. दरम्यान महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतकी जास्त एक्सचेंज ऑफर मिळण्यासाठी जुन्या फोनचं मॉडेल आणि कंडीशन चांगली असणं गरजेचं आहे.
iPhone 13 स्पेसिफिकेशन्स
तर iPhone 13 मध्ये ६.१ इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले आणि A15 बायोनिक चिपसेटचा सपोर्ट आहे. या स्मार्टफोनमध्ये १२ मेगापिक्सलचा ड्युअल रेअर कॅमेरा सेटअप आणि नाइट मोडसह १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

वाचा : Smartphone tips : तुमचा नवीन फोन बनावट तर नाही ना? खरेदी करण्यापूर्वी ‘या’ ५ गोष्टी नक्की चेक करा