भारत सरकारच्या ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ची मल्टिटास्किंग आणि हवालदार पदांसाठी भरती

SSC MTS & Havaldar Recruitment 2023: भारत सरकारच्या (Government of India) स्टाफ सिलेक्शन कमिशनने (Staff Selection Commission) ने मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ (MTS) आणि हवालदार (CBIC And CBN) पदांच्या भरती जाहीर केली असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांना Staff Selection Commission च्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

तब्बल ४ जागांच्या भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनने ही भरती जाहीर केली असून, उमेदवारांना SSC च्या अधिकृत वेबसाइटवर हा अर्ज भरता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै २०२३ रात्री ११ वाजेपर्यंत असणार आहे. तर, उमेदवारांना २६ जुलै ते २८ जुलै २०२३ या दिवसांत आपल्या अर्जांमध्ये बदल किंवा चुका दुरुस्त करता येणार आहेत.

SSC MTS (Tier-I) संगणक-आधारित परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार आहे. भरती प्रक्रियेत एकूण ३ हजार ९५४ MTS पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. तर, CBIC आणि CBN मध्ये हवालदार पदाच्या सुमारे १ हजार ७५८ जागा रिक्त आहरेत.

SSC MTS & Havaldar भरतीचे वेळापत्रक :

  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: २१ जुलै २०२३, रात्री ११ वाजेपर्यंत
  • ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख: २२ जुलै
  • ऑफलाइन चलन तयार करण्याची अंतिम मुदत: २३ जुलै २०२३ (रात्री ११ वाजेपर्यंत)
  • चलन भरण्याची अंतिम तारीख: २४ जुलै २०२३
  • ऑनलाइन अर्ज फॉर्म दुरुस्ती आणि बदल: २६ जुलै ते २८ जुलै २०२३
  • संगणक-आधारित परीक्षेची तारीख: सप्टेंबर २०२३

पात्रता निकष खालीलप्रमाणे :

० वयोमर्यादा: CBN (महसूल विभाग) परीक्षेत MTS आणि हवालदारासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार १८ ते २५ वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे.

० सीबीआयसी (महसूल विभाग) मध्ये हवालदार आणि एमटीएसच्या इतर काही पदांसाठी अर्ज करणाऱ्यांचे वय १८ ते २७ वर्षे असावे.
तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादा शिथिलता लागू आहे.

शैक्षणिक पात्रता:

SSC परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रतेने उत्तीर्ण केलेले असावे.

SSC MTS आणि हवालदार भरतीसाठी परीक्षा शुल्क :

  • सर्वसाधारण प्रवर्ग (General Category) आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
  • महिला, ST/ST/PWD/ माजी सैनिक यांना भरती परीक्षेसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

असा करा अर्ज :

१. SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
२. पोर्टलवर नोंदणी करा आणि लॉग इन करा,
३. त्यानंतर ‘मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) कर्मचारी परीक्षा २०२३ मध्ये ‘Apply’ वर क्लिक करा.
४. विचारलेल्या आवश्यक माहितीसह फॉर्म भरा.
५. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून परीक्षा शुल्क भरा.
६. पूर्ण भरून झाल्यानंतर अर्ज पुन्हा व्यवस्थित तपासून सबमिट करा.

महत्त्वाचे :

अर्जाची प्रक्रिया जलद, सुलभ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी आयोगाने सर्वांसना ऑफलाइन चलनाद्वारे अर्ज शुल्क भरणा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. एसएससीच्या अधिकृत वेबसाईटवर याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे, ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी नेट-बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड, BHIM अथवा UPI इत्यादींचा वापर करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने देण्यात आले आहे.

Source link

cbiccbnGovernment jobgovernment of indiahavaldarmtssarkari naukarissc mtsSSC Recruitmentstaff selection Commission
Comments (0)
Add Comment