मुंबई विद्यापीठाच्या Institute of Distance & Open Learning (IDOL) मधील या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा (Entrance Exam) देणे अनिवार्य असणार आहे. या प्रवेश परीक्षेसाठी बुधवार, दिनांक १२ जुलै २०२३ पासून ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज भरण्याला सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांना २४ जुलै २०२३ पर्यंत हे अर्ज भरता येणार आहेत.
(वाचा : SDM ज्योती मौर्यने केलेल्या कृत्यानंतर सर्च होतेय SDM करिअर, जाणून घ्या या पद आणि त्याच्या पगाराविषयी)
एमएमएस व एमसीए या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या घोषणे बरोबरच विद्यापीठाने, एमएमएस (MMS) आणि एमसीए (MCA) या दोन्ही अभ्यासक्रमांसाठीच्या आवश्यक प्रवेश प्रक्रिया रविवार, १३ ऑगस्ट २०२३ रोजी ऑनलाईन होणार आहे.
आयडॉलमधून दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरु होणाऱ्या या अभ्यासक्रमातील २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांपासून एआयसीटीई व यूजीसीने आयडॉलला मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (Masters of Management Studio) या अभ्यासक्रमासाठी ७२० जागांची मान्यता दिली आहे, हा अभ्यासक्रम एमबीए या अभ्यासक्रमाच्या समकक्ष असणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे.
(वाचा : NEET UG Failures: NEET मध्ये अपशय मिळाल्याने होऊ नका हताश, करिअरचे आहेत अनेक पर्याय, जाणून घ्या)
तसेच, आयडॉलमध्ये मास्टर ऑफ कॉम्प्युटर अँप्लिकेशन (एमसीए ) हा दोन वर्षाचा सुधारित अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाला एआयसीटीई व यूजीसीने २००० जागांची मान्यता मिळाली आहे.
एचआर, फायनान्स व मार्केटिंग या तीन विषयात एमएमएस हा अभ्यासक्रम करता येतो. या दोन्ही प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन माध्यमातून भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना हे अर्ज भरता येणार आहेत.
मुंबई विद्यापीठाने एमएमएस व एमसीए सारखे महत्वाचे अभ्यासक्रम दूरस्थ माध्यमातून सुरु केले आहेत. नोकरी करणाऱ्यांसाठी व ज्या विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळू शकला नाही त्यांच्यासाठी ही एक संधी आहे.
(वाचा : SSC Recruitment 2023: भारत सरकारच्या ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ची मल्टिटास्किंग आणि हवालदार पदांसाठी भरती)