चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संगीत महाविद्यालयासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, ज. जी. वास्तूशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता रणजित हांडे, अधीक्षक अभियंता प्रमोद गोसावी, मुख्य वास्तू शास्त्रज्ञ आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयासाठी जागेची निवड करण्यात आली आहे. वास्तू आराखडा (डिझाइन) विविध वास्तू विशारद संस्थांची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वास्तू विशारद संस्थांचाही प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेंतर्गत वास्तू आराखड्याचे आज सादरीकरण करण्यात आले. स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या वास्तू विशारद संस्थांचा पुरस्कार देवून सन्मान देखील केला जाणार आहे. लवकरच या महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन केले जाणार असून त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाणार आहे.
(वाचा : University Of Mumbai: आयडॉलच्या एमएमएस व एमसीए प्रवेश परीक्षांच्या ऑनलाइन अर्जांना सुरुवात)
विजेत्याला मिळणार दोन लाखांचे बक्षीस
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते उद्धाटन झाले होते. आता या महाविद्यालयाचं आणि संग्रहालयाचं डिझाइन कसं असावं यासाठी वास्तुविशारदांसाठी खास स्पर्धा भरवण्यात येणार आहे. प्रथम विजेत्याला दोन लाखांचे बक्षीस दिलं जाणार आहे. इमारतीच्या बांधकामाचं डिझाईन या स्पर्धेतूनच निवडण्यात येणार आहे.
लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयासाठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील सात हजार चौरस मीटर इतकी जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी कला संचालकांना हस्तांतरित केली आहे. आता या महाविद्यालयातील प्रमाणपात्र अभ्यासक्रमांना सुरुवात झाली आहे. तसेच महाविद्यालयाची वास्तू तयार झाल्यानंतर कलिनामध्ये महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे.
(वाचा : करिअरचे ‘मॅनेजमेंट’ करताना, कोणत्या संधीची दारे होतील खुली जाणून घ्या!)
असा असणार अभ्यासक्रम :
लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात सुरू करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, भारतीय बासरी वादन, तबला वादन, सतार वादन, हार्मोनियम/कीबोर्ड वादन, ध्वनी अभियांत्रिकी अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या महाविद्यालयाचे कामकाज व्यवस्थित व उत्कृष्ट दर्जाचे होण्यासाठी हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळ नेमण्यात आले असून यामध्ये उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर, मयुरेश पै तसेच कला संचालक सदस्य असतील.
इथे बनणार लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय :
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर उच्च व तंत्र शिक्षण विभागाची जागा आहे. याच जागेत भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. या कामासाठी एका खास समितीची स्थापना करण्यात आली आहे.
(वाचा : Employment Rights: करिअरनंतर नोकरीची सुरूवात करताय, तर लक्षात ठेवा हे नियम होईल भरभराट)