हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये कामाची संधी; ट्रेड अप्रेंटिसच्या १८४ जागांसाठी भरती

HCL Recruitment 2023: हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) ने अप्रेंटिस कायदा १९६१ अंतर्गत ट्रेड अप्रेंटिससाठी १८४ रिक्त जागांची घोषणा केली आहे. या भरतीसाठी ६ जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

ट्रेड अप्रेंटिसच्या १८४ पदांसाठी ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज HCL ट्रेड अप्रेंटिस २०२३ साठी अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून सबमिट करू शकतात. ५ ऑगस्ट ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी १९ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांनी निवडलेल्या ट्रेडनुसार १ ते ३ वर्ष कालावधीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता :

उमेदवारांनी १०+२ शिक्षण प्रणालीमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केलेली असावी किंवा मेट (माइन्स) और ब्लास्टर (माइन्स) च्या व्यापारासाठी त्याच्या समकक्ष ज्ञान असणे आवश्यक आहे.

इतर ट्रेडसाठी उमेदवारांनी १०+२ अंतर्गत दहावी किंवा त्याच्या समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिवाय, उमेदवाराला मान्यताप्राप्त संस्थेकडून संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र मिळवलेले असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

१८ ते २५ वर्षे वयोगटातील उमेदवार HCL भरती २०२३ साठी अर्ज करू शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेतही सवलत देण्यात आली आहे. या संबंधीत अधिक माहिती HCL च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

निवड प्रक्रिया :

उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.
दहावी आणि ITI मार्कांच्या आधारे गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
या संबंधित अधिक तपशील उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकतात.

असा करा अर्ज :

-उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
-त्यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
-वैयक्तिक तपशील प्रविष्ट करून सबमिट करा.
-फॉर्म भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
-यानंतर, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

Source link

apprenticeshipGovernment jobhclhcl apprenticeshiphcl recruitment 2023hindustan copper limiteditiiti jobsminingtraining
Comments (0)
Add Comment