OnePlus 12 चा फर्स्ट लुक झाला लिक, दमदार असणार कॅमेरा

नवी दिल्ली : OnePlus च्या आगामी नवीन स्मार्टफोन OnePlus 12 ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ज्यानंतर आता काही ठिकाणी या स्मार्टफोनचा फर्स्ट लूक देखील लीक झाला आहे. या हँडसेटशी संबंधित काही माहिती देखील लीक झाली आहे. असे मानले जात आहे की हा कंपनीचा पुढील फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल. हा फोन रिलीज व्हायला अजून बराच वेळ आहे, पण कॅमेरा आणि डिझाईनबाबत काही गोष्टी आताच समोर आल्या आहेत.
ताज्या लीक झालेल्या माहितीनुसार, OnePlus 12 च्या लीक झालेल्या फोटोजमध्ये फोनचे डिझाईन दिसत आहे. संबधित माहिती ही Smart Prix ने OnLeaks च्या सहकार्याने शेअर केली आहे. ट्रायल युनिट प्रोटोटाइपच्या रिअल लाइफ इमेजेसचा वापर करून हे रेंडर विकसित केले गेले आहेत, असे सांगण्यात आले आहे. यामध्ये एकूण चार फोटो आहेत जे OnePlus 12 चे डिझाईन दाखवतात, जे दाखवतात की OnePlus 12 प्रत्यक्षात कसा दिसतो.

हँडसेट काळ्या रंगात दाखवला आहे

लीक झालेल्या रिपोर्टनुसार, OnePlus 12 ग्लॉसी फिनिशसह काळ्या रंगात दिसत आहे. कंपनी लाँचच्या वेळी अधिक रंगांसह सादर करू शकते. समोर आलेले हे फोटो पाहून असे दिसते की ते सध्याच्या OnePlus 11 पेक्षा डिझाईनच्या बाबतीत खूप वेगळे आहे. जरी मागील बाजूस दिसणारे मोठे वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल OnePlus 11 सारखेच आहे. OnePlus 12 मध्ये, कॅमेरा मॉड्यूलमधील LED फ्लॅश डाव्या कोपर्‍यात हलवण्यात आल्याचे दिसते.

डिस्प्लेच्या मध्यभागी सेल्फी कॅमेरा

OnePlus 12 मधील सेल्फी कॅमेरा पाहिल्यास, तो डिस्प्लेच्या मध्यभागी असल्याचे दिसते. लीक झालेल्या प्रतिमांनुसार, अलर्ट स्लाइडर आणि पॉवर बटण उजव्या बाजूला आहे. 91mobiles ने दिलेल्या माहितीनुसार, OnePlus 12 च्या डिझाईनमध्ये कोणताही मोठा बदल होणार नाही. काही बदलांसह हे प्रोडक्ट नक्कीच बाजारात येऊ शकते. आत्तापर्यंत,आणखी इतर कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

वाचा : WhatsApp ग्रुपमध्ये तुमचा नंबर राहणार सेफ, आता Hide करण्याचा खास ऑप्शन लवकरच येणार

Source link

oneplus 12 featuresoneplus 12 first lookoneplus 12 priceवनप्लस १२ चे फीचर्सहे तपशील लीक झाले
Comments (0)
Add Comment