बॅचलर ऑफ डेंटल सर्जन ते यशस्वी IAS
डॉ. तनु जैन या दिल्लीच्या गजबजलेल्या भागातील रहिवासी आहेत. शाळेत असताना अभ्यासात जेमतेम लक्ष असणाऱ्या तनुचे खेळात मात्र जास्त रस होता. त्यामुळे, मध्यमवर्गीय कुटुंबातील तनुला कधीही परीक्षेत ९९% गुण मिळवण्यासाठी दबाव नव्हता. बारावीनंतर बीडीएस (बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी)साठी शिष्यवृत्ती फॉर्म भरणाऱ्या तनुला सरकारी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या नातेवाईकामुळे त्यांना नागरी सेवा आणि त्याचे महत्त्व कळले आणि त्यांनी त्यादृष्टीने मेहनत करण्यास सुरुवात केली.
दिल्लीतील केंब्रिज शाळेतून बारावीपर्यंत शिक्षण
डॉ. तनु जैन यांनी दिल्लीतील केंब्रिज शाळेतून बारावीपर्यंत शिक्षण घेतले असून, त्यानंतर त्यांनी मेरठच्या सुभारती मेडिकल कॉलेजमधून बीडीएस म्हणजेच बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीची पदवी मिळवली. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
अवघ्या २ महिन्यांच्या तयारीत UPSC प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण
डॉ. तनू यांनी अवघ्या २ महिन्यांच्या तयारीत UPSC प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण केली होती. उत्तीर्ण झाल्यानंतरही तिने अनेकदा ही परीक्षा दिली आणि प्रत्येकवेळी ती यशस्वीही झाली. एवढेच नव्हे, तर ४ वेळा त्या UPSC मुलाखतीलाही गेल्या होत्या.
सशस्त्र दल मुख्यालय सेवेत काम करण्याची संधी
याआधी २०१२ मध्ये जैन पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली होती. तिने प्राथमिक फेरीत बाजी मारली. सुरुवातीच्या अपयशानंतरही, ती टिकून राहिली आणि २०१४ मध्ये तिसर्या प्रयत्नात त्यांना इच्छुनुसार यश मिळाले. त्यावेळी, तिचा AIR (All India Rank) ६४८ व होता. २०१५ मध्ये, तिने सशस्त्र दल मुख्यालय सेवेत त्यांना पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली.
इंस्टाग्रामवर त्याचे ८० हजारांहून अधिक फॉलोअर्स
डॉ. तनु जैन सोशल मीडियावर खूप सक्रिय आणि लोकप्रिय आहेत. इंस्टाग्रामवर त्याचे ८० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांनी दिल्लीत तथास्तु-आयसीएस नावाचे आयएएस कोचिंग स्थापन केले आहे. डॉ. तनू जैन म्हणतात की, पूर्णवेळ नोकरीसह UPSC परीक्षेची तयारी करणारे उमेदवार दररोज ५ तासांपेक्षा जास्त अभ्यास करू शकत नाहीत. यासोबतच तयारी करताना भावनिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि नातेसंबंधांचा समतोल राखणे आवश्यक असल्याचा सल्ला त्या देतात.
UPSC मॉक इंटरव्ह्यू मधील महत्त्वाचे सदस्य
त्या एक सुप्रसिद्ध नागरी सेवक आहे आणि UPSC परीक्षा इच्छूकांना रील आणि लहान व्हिडिओंद्वारे टिप्स देते. त्यांनी आपले पती वात्सल्य पंडित (वात्सल्य पंडित IAS) सोबत अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत. मॉक इंटरव्ह्यू पॅनलचे (UPSC मॉक इंटरव्ह्यू) महत्त्वाचे सदस्य म्हणून त्यांची ओळख आहे.
पती IAS वात्सल्य पंडित यांची तनूला साथ
सध्या काम सांभाळून ती गृहिणी म्हणून घरही सांभाळते. पती IAS वात्सल्य पंडित यांनी तनूला खूप साथ दिली. आता दोघांना राजवर्धन नावाचा दोन वर्षांचा मुलगा आहे. वात्सल्य पंडित हे स्वतः नागरी सेवेत आहेत. यासोबतच तो मोटिव्हेशनल स्पीकरही आहेत.