मेडिकल अभ्यासक्रमामधील नेक्स्ट या स्पर्धा परीक्षेला पुढील आदेशापर्यंत स्थगिती, आरोग्य मंत्रालयाची मोठी घोषणा

NExT Exam Updates: वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पीजी (Post Graduation) साठी दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या NEET PG परीक्षेऐवजी NExT (National Exit Test) ही परीक्षा घेतली जाणार असून, नेक्स्ट परीक्षेतील गुणांच्या आधारे एमडी, एमएसकरिता प्रवेश दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

याशिवाय एमबीबीएस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार असल्याचे सांगण्यात आले होते.भारतात आणि परदेशात शिकलेल्या प्रत्येकाला भारतात Medical Practice करण्यासाठी ही परीक्षा देणे अनिवार्य करण्यात आले होते.

मात्र आता, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नॅशनल एक्झिट टेस्ट (नेक्स्ट) परीक्षेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून पुढील आदेश येईपर्यंत या परीक्षेला स्थगिती देण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, ११ जुलैला आलेल्या निर्णयानुसार पुढील निर्देश येईपर्यत ही होणार नसल्याचे मंत्रालयाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.

(वाचा : NExT Exam Updates: National Exit Test थेट पुढच्या वर्षी; केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी केली घोषणा)

नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) ने अलीकडेच जाहीर केले होते की ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), दिल्ली पुढील परीक्षा घेईल. यानंतर एम्सनेही नोटीस जारी करत, २८ जुलै रोजी मॉक टेस्टसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ६ जुलै रोजी AIIMS रायपूर येथे एका कार्यक्रमात घोषणा करत परीक्षा पुढील वर्षीपासूनहोणार असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना दिलासा दिला होता. पण, आता NExT साठी पुढचा मुहूर्त काय ठरणार आणि आरोग्य मंत्रालय याबाबतीत काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

नक्की होणार काय…?

सर्व वैद्यकीय इच्छुकांसाठी व्यावहारिक प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षणावर समान भर देण्याची खात्री करण्यासाठी NExT ची संकल्पना पुढे आली होती. या परीक्षेने NEET PG ची जागा घेतली असती. म्हणजेच या परीक्षेतील गुणांच्या आधारे एमडी आणि एमएस अभ्यासक्रमांना प्रवेश दिला गेला असता.

शिवाय, एमबीबीएस अभयसक्रमांच्या अंतिम वर्षाच्या उमेदवारांनादेखील ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागून त्याच धर्तीवर त्यांना त्यांना वैद्यकीय परवाना मिळणार होता.त्यामुळे आता स्थगितीनंतर, आरोग्य मंत्रालय पुढे काय पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

(वाचा : NEET UG Failures: NEET मध्ये अपशय मिळाल्याने होऊ नका हताश, करिअरचे आहेत अनेक पर्याय, जाणून घ्या)

Source link

aiimsexams updatesgovernment of indiambbsmedical educationministry of health and family welfarenational exit testNEET PGnext entrance updatesnext exam updates 2023
Comments (0)
Add Comment