राज्यात वैद्यकीय शिक्षण महागणार; मेडिकल कॉलेजांमधील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या शुल्कात ५ टक्के वाढ

MBBS Fees Increased 2023: NEET UG 2023 चा निकाल नुकताच जाहीर झाला. परंतु, अखिल भारतीय कोट्यातील प्रवेश प्रक्रियेला अद्यापही सुरुवात करण्यात आलेली नाही. मात्र, अनेक राज्यांनी राज्य कोट्यातील ८५ टक्के जागांसाठी समुपदेशन प्रक्रिया सुरू केली आहे. पण याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील अनेक खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वार्षिक शुल्कात एक लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या फी वाढीमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या शुल्कात ५ टक्के वाढ केल्याने राज्यात वैद्यकीय शिक्षण अधिक महाग होणार आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग (DMER) ने अलीकडील अधिसूचनेत सुधारित शिक्षण शुल्क संरचना जाहीर केली आहे.

या अधिसूचनेनुसार, सर्व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी एमबीबीएस पूर्ण अभ्यासक्रमाची फी ५२.६० लाख रुपयांवरून थेट ५५.२५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर, खासगी महाविद्यालयांमध्ये सरकारी कोट्यातील जागांकरिता शुल्क २०.४५ लाखांवरून २१.४८ लाखांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

प्रत्येक खाजगी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयात त्यांच्या एकूण जागांपैकी ५० टक्के जागा सरकारी कोटा म्हणून राखीव असतात. उर्वरित ५० टक्के जागांमध्ये व्यवस्थापन कोट्याच्या ३५ टक्के आणि एनआरआय कोट्याच्या १५ टक्के जागा आहेत. NRI कोट्याच्या जागांसाठी फी रचनेत कोणताही बदल न करता ही फी US $1.10 लाख आहे.

प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार बहुतांश महाविद्यालयांची वार्षिक फी सुमारे १० लाख रुपयांहून अधिक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, सांगलीने गेल्या वर्षी ४० टक्के फी कपात करून फचा आकडा ७ ते ८ लाख रुपयांपर्यत आणली होती. मात्र यावर्षी अनेक कॉलेजांनी त्यांच्या फीमध्ये वाढ केली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, पालघर आणि पुण्यात सुरू झालेल्या दोन नवीन वैद्यकीय महाविद्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व महाविद्यालयांच्या शुल्कात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून विविध सत्रांचा फीमध्ये वाढ केली आहे.

वैद्यकीय परिषदेच्या समितीनेही अखिल भारतीय कोट्याअंतर्गत समुपदेशनाची तयारी सुरू केली आहे. लवकरच समुपदेशनासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होऊन, नोंदणी सुरू झाल्यानंतर, NEET UG 2023 परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकणार आहेत.

नोंदणी प्रक्रिया संपल्यानंतर, जागा वाटप MCC द्वारे केले जाईल. त्यानंतर यादीत स्थान मिळविणाऱ्या उमेदवारांना विहित तारखेपर्यंत संबंधित महाविद्यालयात कळवावे लागेल. जर उमेदवाराने विहित तारखेपर्यंत शुल्क जमा केले करून कॉलेजमध्ये आपला प्रवेश निश्चित न केल्यास सदर विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाणार असल्याची शक्यता आहे. शिवाय, प्रवेशासंदर्भातील नियमही काही अंशी कडक करण्यात आले आहेत.

Source link

dmereducation newsmbbsmbbs admissionmbbs fees hikembbs studentsMCCmedical educationNEET UG 2023
Comments (0)
Add Comment