​Amazon Sale मध्ये २ हजार रुपयांपेक्षाही स्वस्तात मिळतील मस्त स्मार्टवॉच, ‘हे’ आहेत ५ बेस्ट पर्याय

beatXP Vega 1.43 (3.6 cm) सुपर AMOLED

ही वॉच फुल टच AMOLED डिस्प्लेसह येते. यात स्लिम बेझल्स आहेत. तसंच स्टायलिश डिझाइनमुळे ही वॉच आणखी खास वाटते. कस्टमाइझ करण्यायोग्य क्लाउड-बेस्ड वॉच फेससह येणाऱ्या या वॉचमध्ये EzyPairTM तंत्रज्ञान देण्यात आले आहे. माइक आणि स्पीकर देखील यात दिला गेला आहे. हृदय गती, SpO2 आणि स्लीप मॉनिटर देखील दिले आहेत. त्याची किंमत १,७९९ रुपये आहे.

Fireboltt Phoenix स्मार्ट वॉच 1.3 वॉच

फायर-बोल्ट फिनिक्स स्मार्ट वॉच 1.3″ ही देखील एक स्टायलिश डिझाईन असणारी स्मार्टवॉच आहे. यात १.३ इंचाचा TFT कलर फुल टच स्क्रीन डिस्प्ले देखील आहे. ही वॉच एका चार्जवर ४ दिवस वापरता येतो. यात ऑन-द-गो सिस्टम आहे. याच HRS3300 तंत्रज्ञान देखील दिले आहे. या वॉचची किंमत १,३९८ इतकी आहे.

​boAt Wave Call Smart Watch 1.69 HD

बोट कंपनीच्या या वॉचमध्ये बिल्ट-इन प्रीमियम स्पीकर आहेत. यामध्ये ब्लूटूथ कॉलिंग फीचरसह इतर अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये तुम्ही महत्वाचे १० कॉन्टॅक्ट्स देखील सेव्ह करू शकता. यासोबतच यात २.५डी कर्व्ह टच इंटरफेस देण्यात आला आहे. त्याच वेळी, 550 nits ब्राइटनेस देखीलदिला आहे. १५० पेक्षा जास्त क्लाउड वॉच फेस यात आहेत. याशिवाय हार्ट रेट, SpO2, फिटनेस ट्रॅकर, टेक्स्ट एसएमएस, पेडोमीटर सारखे फीचर्स देखील आहेत. याची किंमत १,१९९ रुपये आहे.

वाचा : Smartphone Tricks : पॉवर बटन न वापरता ऑन करु शकता फोन, ‘या’ आहेत ५ सोप्या ट्रिक्स

Endefo Enfit Bold – Round ​डिस्प्ले 1.32

या वॉचमध्ये १.३२ इंचाचा डिस्प्ले आहे. यासोबतच ब्लूटूथ कॉलिंगचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. यात ३५ हून अधिक स्पोर्ट्स मोड आणि 200+ वॉच फेसेस देण्यात आले आहेत. याशिवाय, ब्लड ऑक्सिजन लेव्हल मोजण्याचे फीचर्सही आहेत. कॅमेरा कंट्रोल आणि मल्टीपल लँग्वेज सपोर्ट देखील यात आहे. याची किंमत १,९९९ रुपये आहे.

वाचा : Google Maps : ड्रायव्हिंग करताना गुगल मॅप वापरता? ‘हे’ पाच फीचर्स वापरा, पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल

Noise Twist Smart Watch डिसप्ले 1.38

यामध्ये १.३९ इंचाचा TFT डिस्प्ले आहे. तसेच स्लीक मेटॅलिक फिनिशसह ही वॉच येतो. या वॉचची किंमत १,३९९ रुपये असून Noise हेल्थ सूट देण्यात आला आहे, ज्यामध्ये ब्लॉक ऑक्सिजन मॉनिटरचा समावेश आहे. , स्लीप मॉनिटर, 24×7 हार्ट रेट मॉनिटर, स्ट्रेस मॉनिटर यांसारख्या वैशिष्ट्यांचा देखील यात समावेश आहे. फिमेल सायकल ट्रॅकर देखील यात देण्यात आला आहे. ७ दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ १०० स्पोर्ट्स मोडसह ही वॉच येते.

​वाचा : जर प्राणी माणसांसारखे दिसले असते तर? AI नं तयार केलेले हे ‘विचित्र’ फोटो पाहिले का?

Source link

amazon prime day sale offersAmazon Sale Dealstop 5 smartwatches to buy in Amazonअॅमेझॉन प्राईम डे सेलस्वस्तात मस्त स्मार्टवॉच
Comments (0)
Add Comment