Flipkart Sale मध्ये iPhone 14 Plus वर तगडी ऑफर, १५ हजारांपर्यंत डिस्काउंट मिळवण्याची संधी

वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स
नवी दिल्ली :
iPhone 14 Plus हा सध्याच्या लेटेस्ट आयफोन मॉडेल्समधील मोठ्या स्क्रिनचा फोन अगदी स्वस्तात मिळत आहे. यावर सध्या फ्लिपकार्टवर उत्तम ऑफर दिली जात आहे. या फोनच्या 128 GB वेरिएंटची किंमत ८९,९९० रुपये आहे, पण सूट मिळवल्यावर हा फोन थेट ७३,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. एक्सचेंज ऑफर अंतर्गत, तुम्ही वापरलेल्या स्मार्टफोनवर आणखी ३५,६०० पर्यंत EMI पर्याय वापरून अतिरिक्त 10% सूट मिळवू शकता. त्याच्या वैशिष्ट्यांमध्ये A15 बायोनिक चिपसेट, ६.७ इंचाचा डिस्प्ले आणि ड्युअल रेअर कॅमेरा यांचा समावेश आहे. फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेलचे आयोजन करण्यात आले आहे. यातच ही ऑफर दिली जात आहे.

iPhone 14 Plus 256GB मॉडेलवरही ऑफर

iPhone 14 Plus च्या 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ८९,९९० रुपये आहे पण तो ७३,९९९ रुपयांमध्ये डिस्काउंटसह खरेदी करता येईल. त्याच वेळी, फोनच्या 256 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ८३,९९९ रुपये आहे. त्याच वेळी, 512GB वेरिएंटची किंमत १,०३,९९९ रुपये आहे. तिन्ही प्रकारांवर १५,९०१ रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे. फ्लिपकार्ट ३५,६०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देत आहे. म्हणजेच तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला ही ऑफर मिळू शकते. जर तुम्ही पेमेंटसाठी अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला EMI पर्याय दिला जाईल. वापरकर्ते १ हजारांपर्यंत अतिरिक्त १० टक्के सूट देखील मिळवू शकतात.
वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स

iPhone 14 Plus चे फीचर्स
यात ६.७ इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे. तसेच डायनॅमिक आयलंड स्टाइल नॉच आहे. यामध्ये A15 बायोनिक चिप देण्यात आली आहे. तसेच डुअल रेअर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचा पहिला सेन्सर 12 मेगापिक्सेलचा आहे. दुसरा 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. त्याच वेळी, 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

वाचा : Gpay वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! आता पिन न टाकता ही करता येणार UPI पेमेंट

Source link

Iphone 14 Plus featuresiphone 14 plus offerIphone 14 Plus priceआयफोन १४ प्लस किंमतआयफोन १४ प्लसवर ऑफर
Comments (0)
Add Comment