विद्यार्थ्यांनी कसे करावे अभ्यासाचे नियोजन; खास टिप्स तुमच्यासाठी…!

Study Management for 11th and 12th Standard: महाराष्ट्र बोर्डाने ११वी आणि १२वी विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमाची रचना सीबीएसई प्रमाणे केली आहे. १२ वीची बोर्डाची परीक्षा सब्जेक्टिव्ह असते. तिथे दिर्घोत्तरी प्रश्न,गणिते, संकल्पना स्पष्ट, करा हे आणि यांसारखे अनेक प्रश्न विचारले जातात.

अखिल भारतीय पातळीवर प्रवेश परीक्षांमध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. या परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. चुकीचे उत्तर लिहिल्यास गुण वजा केले जातात. बोर्डाच्या परीक्षेत उत्तरे पाठ करून विद्यार्थी थोडेफार गुण मिळवू शकतात, पण प्रवेश परीक्षेत पाठांतर करून गुण मिळवणे शक्यच नसते.

एकाच संकल्पनेवर आधारीत असंख्य प्रश्न काढता येतात. त्यामुळे प्रवेश परीक्षेच्या तयारीमध्ये संकल्पना समजावून घेण्याच्या बरोबरीनेच त्याचे उपयोजन (अ‍ॅप्लिकेशन) करणे हे महत्त्वाचे आहे. प्रवेश परीक्षेमध्ये वेळही मर्यादित असतो त्यामुळे एकाच प्रश्नावर फारवेळ थांबून चालत नाही.

(वाचा : Career BTech: १२वी नंतर इंजिनिअरिंग-बी. टेक करण्याच्या विचारात आहात; या अभ्यासक्रमांमुळे मिळू शकते लाखोंची नोकरी)

दहावीपेक्षा बारावी पूर्णपणे वेगळीच :

  • दहावीच्या परीक्षेतील ‘लक्षात ठेवा / पाठ करा व ते परीक्षेत उतरवून काढा’, हे तंत्र १२वीला फारसे उपयोगी पडत नाही.
  • १२ वीला आधी संकल्पना समजून घेणे, लक्षात ठेवणे व परीक्षेत त्याचे कमीत कमीवेळात अ‍ॅप्लिकेशन करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे विज्ञानशाखेच्या विद्यार्थ्यांनी हे का?
  • (WHY) व कसे (HOW) हे प्रश्न विचारण्याची सवय लावली पाहिजे.
  • रोजचा अभ्यास रोज करणे महत्त्वाचे आहे. स्वत:च्या अभ्यासासाठी वेळ काढणेही महत्त्वाचे आहे.
  • विविध संकल्पना समजून घेण्यासाठी युट्यूबवरील विविध व्हिडीओ पाहणे आणि अभ्यासातील सातत्य फार महत्त्वाचे

(वाचा : CBSE Exam 2024: सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षेसाठी सोडलेला नमुना पेपर,असे डाऊनलोड करा सँपल पेपर)

प्रवेश परीक्षांची तयारी करताना :

० विविध प्रवेश परीक्षांच्या आदल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यास संकल्पनावर आधारित प्रश्नांची संख्या अधिक दिसते.

० प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या पुस्तकांबरोबरीनेच सीबीएसईची ८वी ते १२वीपर्यंतची पुस्तके अभ्यासणे उपयुक्त ठरेल.

० सीबीएसईची पुस्तके एनसीईआरटीच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून घेता येतील. प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम, ११वी आण‌ि १२वी महाराष्ट्र बोर्डाचा अभ्यासक्रम डाऊनलोड करून विद्यार्थ्यांनी आपल्या जवळ ठेवला पाहिजे.

० प्रत्येक विषयासाठी धडे व त्यातील विषयसूची पाहवी. म्हणजे बोर्डाच्या व प्रवेशपरीक्षांमध्ये कोणत्या विषयासाठी किती टॉपिक अभ्यासावे लागणार आहेत, हे लक्षात येईल.

० त्या त्या टॉपिकनुसार त्यावर प्रवेशपरीक्षेत तसेच बोर्डाच्या परीक्षेत कसे प्रश्न विचारले जातील याचा अभ्यास एकाच वेळी करावा.

० बोर्डाच्या तसेच प्रवेश परीक्षेसाठी ९० टक्के अभ्यासक्रम सारखा असतो. म्हणजे प्रत्येक परीक्षेसाठी पुनःपुन्हा त्याच गोष्टी नव्याने शिकण्याची गरज नाही. फक्त प्रश्नाचे स्वरुप भिन्न असते.

० १२वी बोर्डाच्या परीक्षेत प्रश्न वर्णनात्मक असतात तर प्रवेशपरीक्षेत वैकल्पिक (योग्य पर्याय निवडा) स्वरुपाचे असतात. हे लक्षात घेता दोन्ही परीक्षांचा अभ्यास एकत्र करणे शक्य आहे.

(वाचा : IIT Admission: आयआयटी कॅम्पस आता अबू धाबीमध्ये; युएईमध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी)

Source link

Career NewsEducationeducation newsEntrance ExamsHSCsscstudentstudystudy managementstudy tips
Comments (0)
Add Comment