आजचे पंचांग आणि दिनविशेष १९ जुलै २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती आषाढ, २८ शक संवत १९४५ प्रथम (अधिक) श्रावण शुक्ल, द्वितीया, बुधवार, विक्रम संवत २०८०, सौर श्रावण मास प्रविष्टे ५, जिल्हिजा ३०, हिजरी १४४५ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख १९ जुलै २०२३, सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, वर्षा ऋतु.

राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. द्वितीया तिथि दुसऱ्या दिवशी ४ वाजून ३१ मिनिटापर्यंत त्यानंतर तृतीया तिथी प्रारंभ. पुष्य नक्षत्र सकाळी ७ वाजून ५८ मिनिटापर्यंत त्यानंतर आश्लेषा नक्षत्र प्रारंभ. वज्र योग सकाळी १० वाजून २५ मिनिटापर्यंत त्यानंतर सिद्धि योग प्रारंभ. बालव करण दुपारी ३ वाजून २१ मिनिटापर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र कर्क राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-१२,
सूर्यास्त: सायं. ७-१८,
चंद्रोदय: सकाळी ७-१८,
चंद्रास्त: रात्री ८-४३,
पूर्ण भरती: दुपारी १-२३ पाण्याची उंची ४.२५ मीटर, उत्तररात्री १-०५ पाण्याची उंची ३.७० मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ६-३२ पाण्याची उंची ०.८५ मीटर, सायं. ७-२३ पाण्याची उंची १.७४ मीटर.

दिनविशेष: नूतन चंद्रदर्शन.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १३ मिनिटे ते ४ वाजून ५४ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटे ते ३ वाजून ४० मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून ७ मिनिटे ते १२ वाजून ४८ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १८ मिनिटे ते ७ वाजून ३९ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी वाजून १८ मिनिटे ते ९ वाजून १ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत यमगंड राहील. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजेपासून ते १२ वाजून ५५ मिनिटापर्यंत.

आजचा उपाय : गणपती बाप्पाला दूर्वा अर्पण करा आणि जास्वदाचं लाल फुल अर्पण करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologypanchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 19 july 2023आजचे पंचांगआजचे पंचांग आणि दिनविशेष २४ डिसेंबर २०२२
Comments (0)
Add Comment