यासाठी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ऑनलाईन प्रवेश सुरु झाले असून. यात पदव्युत्तर पदवी, पदवी, पदविका, प्रमाणपत्र शिक्षण (सर्टिफिकेट कोर्स) इत्यादी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मध्ये दूरस्थ शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना इथल्या विविध अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना ३० जुलै २०२३ पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने भारत येणार आहेत.
(वाचा : University Of Mumbai: आयडॉलच्या एमएमएस व एमसीए प्रवेश परीक्षांच्या ऑनलाइन अर्जांना सुरुवात)
इच्छुक उमेदवारांनी विद्यापीठात प्रवेश अर्ज भरण्यासाठी :
- सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपली नोंदणी करावी.
- त्यांनतर मिळालेल्या आयडी आणि पासवर्ड चा वापर करून आपल्या खात्यात प्रवेश करावा.
- आपली संपूर्ण प्रोफाइल व्यवस्थित भरावी.
- सर्व डॉक्युमेंटस अपलोड करावेत. तद्नंतर हव्या असणाऱ्या अभ्यासक्रमासाठी अर्ज ऑनलाईन अर्ज करावा.
- व ऑनलाईन प्रकारे परीक्षा शुल्क भरावे.
- सबमिट बटनावर क्लिक करून अर्जाची एक प्रिंट काढावी व ती निवडलेल्या अभ्यासकेंद्रात जमा करावी.
(वाचा : Career BTech: १२वी नंतर इंजिनिअरिंग-बी. टेक करण्याच्या विचारात आहात; या अभ्यासक्रमांमुळे मिळू शकते लाखोंची नोकरी)
महत्त्वाचे :
- राज्यातील बंदिजनांसाठी विविध प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी शिक्षणक्रम पूर्णतः मोफत
- अंध विद्यार्थ्यांना प्रवेशशुल्क माफ
- राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना (शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत) रू.१९०/- मध्ये पदवी शिक्षणक्रमास प्रवेश
अधिक माहितीसाठी संपर्क :
पत्ता :
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विश्वविद्यालय (य.च.म.मु.वि.) चे विभागीय कार्यालय मुंबई
द्वारा जगन्नाथ शंकरशेठ मनपा शाळा, दुसरा मजला,
नाना चौक, ग्रँट रोड (प.), मुंबई ४०० ००७
ई-मेल :
rd_mumbai@ycmou.digitaluniversity.ac
(वाचा : IGNOU Admission: इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी उरलेत काही दिवस; आजच करा ऑनलाइन अर्ज)