अधिक श्रावणातली विनायक चतुर्थी रवि योगात: तिथीवर भद्राचीही सावली, मंत्र, पूजाविधी आणि महत्व जाणून घेऊया

अधिक श्रावण विनायक चतुर्थी महत्व

या शुभ दिवशी विधीपूर्वक श्रीगणेशाची पूजा करून व्रत केल्यास धन, बुद्धी, सुख आणि शांती प्राप्त होते. तसेच या तिथीला गणपतीला २१ दुर्वांची जुडी अर्पण करण्याची परंपरा आहे. म्हणूनच विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती असेही म्हणतात. जर तुम्ही दररोज गणपतीला दुर्वा अर्पण करू शकत नसाल तर या तिथीला दुर्वा अर्पण कराव्यात. असे मानले जाते की, अधिकमासातील विनायक चतुर्थीला केलेली पूजा आणि दान दहापट अधिक फळ देते आणि भगवान गणेश सर्व बाधा दूर करतात.

श्रावण विनायक चतुर्थी मुहूर्त

अधिकमास विनायक चतुर्थी व्रत २१ जुलै २०२३ शुक्रवारी राहील.

प्रारंभ – २१ जुलै, सकाळी ६ वाजून ५८ मिनिटे ते चतुर्थी तिथी समाप्ती – २२ जुलै, सकाळी ९ वाजून २६ मिनिटापर्यंत राहील.

गणेश पूजा मुहूर्त – सकाळी ११ वाजून ५ मिनिटे ते दुपारी १ वाजून ५० मिनिटापर्यंत.

अधिकामास विनायक चतुर्थी व्रतासह रवियोग आणि भद्राची सावली

अधिकामाच्या विनायक चतुर्थीनिमित्त रवियोग तयार होत आहे. या तिथीला दुपारी १:५८ ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ जुलै रोजी सकाळी ६:१२ पर्यंत रवि योग असेल. या दरम्यान धार्मिक कर्माशी संबंधित कार्य केल्याने पुण्य प्राप्त होते आणि जीवनात सकारात्मकता राहते. दुसरीकडे, भद्राची सावली रात्री ८:१२ ते दुसऱ्या दिवशी सकाळी २२ जुलै ६:१२ पर्यंत राहील. भद्राचा वास पृथ्वीजगतात असल्याने या काळात कोणतेही शुभ कार्य करू नका आणि मनात गणेश मंत्राचा जप करा.

गणपती बाप्पाचे मंत्र

भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करताना ‘श्री गणेशाय नमः दुर्वांकुरण समर्पयामि’ या मंत्राचा जप करा. असे केल्याने समस्यांपासून मुक्ती मिळते आणि श्रीगणेशाच्या आशीर्वादाने सुख-समृद्धी मिळते.

ॐ गंग गणपतये नमो नमः
ॐ एकदन्ताय विघ्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् ॥
ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा ॥
अधिक श्रावणाच्या पहिल्या विनायक चतुर्थीला या मंत्रांचा सकाळ संध्याकाळ १०८ वेळा जप नक्की करा.

विनायक चतुर्थी पूजाविधी

विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून ध्यान करावे व लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. यानंतर हातात अक्षदा घेऊन व्रताचा संकल्प करावा. मध्यान्ह वेळी गणेशाचा जन्म झाल्यामुळे दुपारी गणेशाची पूजा केली जाते. त्यानंतर दुपारी गणेशमूर्ती किंवा गणेशाच्या प्रतिमेचे प्रतिष्ठापना करून षोडशोपचार पूजा करावी. गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि कपाळावर गंध लावा. ‘श्री गणेशाय नमः दुर्वांकुरण समर्पयामि’ या मंत्राचा जप करताना २१ दूर्वा अर्पण करा. त्यानंतर २१ लाडू श्रीगणेशाला अर्पण करा, त्यातील पाच लाडू गणेशाजवळ ठेवा आणि बाकीचे प्रसाद म्हणून वाटा. पूजेच्या वेळी गणेश चालीसा, गणेशस्त्रोत किंवा गणेश अथर्वशीर्षाचे पठण करा. यानंतर तुपाचा दिवा पेटवून गणपतीची आरती करावी. आपल्या क्षमतेनुसार दान करा आणि ब्राह्मणांना जेऊ घाला. संध्याकाळीही गणपतीची आरती करून उपवासाचा फराळ करा.

Source link

adhik shravan 2023adhik shravan vinayak chaturthi 2023 datevinayak chaturthi july 2023vinayak chaturthi july 2023 in marathiअधिक श्रावण विनायक चतुर्थी २०२३विनायक चतुर्थी
Comments (0)
Add Comment