मात्र त्याआधी एमसीसीने समुपदेशनाच्या नियमावलीत मत्त्वाचे बदल केले आहेत. यापूर्वी किंवा अगदी मागील वर्षापर्यंत समुपदेश फेरीच्या दुसर्याच फेरीपर्यंत विद्यार्थ्यांना ऑप्शन अपग्रेड करता यत होते. मात्र, यावर्षी समुपदेशनाच्या तिसऱ्या फेरीपार्य्त विद्यार्थ्यांना जागा अपग्रेड करता येणार आहेत.
एमसीसीने जाहीर केल्या नवीन नियमांनुसार, जर एखाद्या विद्यार्थ्याला दुसऱ्या फेरी मधील मधील कोणत्याही कॉलेजमध्ये जागा दिली गेली, तर संबंधित विद्यार्थ्यांसाठी जागा बदलाचा पर्याय उलब्ध राहणारा आहे. आणि असे विद्यार्थी समुपदेशनाच्या तिसऱ्या फेरीमध्येही सह्भ्गाई होऊ शकणारा आहेत.
(वाचा : MBBS Fees: राज्यात वैद्यकीय शिक्षण महागणार; मेडिकल कॉलेजांमधील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या शुल्कात ५ टक्के वाढ)
यापूर्वी, प्रवेश प्रक्रियेत केवळ दुसऱ्या फेरीपर्यत जागा अपग्रेट करण्याचा पर्याय उपलब्ध असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना न पसंतीचे कॉलेज मिळाले तरी त्या कॉलेजमध्ये अंतिम प्रवेश घेण्याखेरीज कोणताही पर्याय उपलब्ध नसायचा. मात्र, यावेळी मेडिकल कौसिंग कमिटीने विद्यार्थ्यांना फक्त दुसऱ्या फेरीनंतरही जागा अपडेट करण्याचा पर्याय खुला ठेवला असल्यामुळे मेडिकल अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
मात्र, नवीन नियमानुसार तिसऱ्या फेरीनंतरही विद्यार्थ्य्णाई प्रवेश न घेतल्यास सदर विद्यार्थ्याची कोणतीही फी परत केली जाणार नसल्याचे मत एमसीसीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. अखिल भारतीय कोट्यातील १५ टक्के जागांवर प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला केंद्रीय विद्यापीठासाठी १० हजार रुपये आणि डीम्ड विद्यापीठासाठी २ लाख रुपये नॉन-रिफंडेबल (विना -परताव तत्वावर) फी भरावी लागणार आहे.
एमसीसी ऑल इंडिया कोटांतर्ग १५ टक्के जागांसाठी समुपदेशन करते. तर राज्यातील ८५ टक्के जागांसाठी संबंधित प्राधिकरणाकडून आयोजित केले जाते. यावेळी NEET UG २०२३ च्या परीक्षेसाठी सुमारे ११ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आणि राजस्थान या राज्यांमधून सर्वाधिक उमेदवार यशस्वी झाले आहेत.
(वाचा : NExT Entrance Updates: पुढील आदेशापर्यंत नेक्स्टला स्थगिती, आरोग्य मंत्रालयाची मोठी घोषणा)