पुण्यातील ‘त्या’ मंदिरातून मोदींचा पुतळा रातोरात गायब; नेमकं काय घडलं?

हायलाइट्स:

  • पुण्यातील ‘त्या’ मंदिरातून पंतप्रधान मोदींचा पुतळा रातोरात गायब
  • औंधमधील भाजप कार्यकर्त्यानं उभारलं होतं मोदींचं मंदिर
  • राष्ट्रवादी काँग्रेसचं मोदी मंदिरासमोर उपरोधिक आंदोलन

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका भक्तानं औंध इथं मंदिर उभारून त्यात बसवलेला मोदींचा पुतळा रातोरात गायब झाला आहे. हा पुतळा नेमका कोणी हटवला याबाबत काहीही कळू शकलं नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज मंदिरासमोर जाऊन प्रतिकात्मक आंदोलनं केलं. (PM Narendra Modi Temple)

वाचा: LIVE …तर शिवसैनिक नारायण राणेंना हाकलून लावतील; राऊतांचा इशारा

औंध येथील मयूर मुंडे व त्याच्या सहकाऱ्यांनी परिहार चौकात मंदिर उभारलं होतं. त्यात मोदींचा अर्धपुतळा बसवण्यात आला होता. एक प्रकारे मोदींना देवाचं स्थान देण्यात आलं होतं. त्यासाठी मुंडे यांनी सुमारे दीड ते दोन लाख रुपये खर्च केले होते. मोदींच्या या मंदिरावरून सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू होती. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश मुळीक यांनी यापासून हात झटकले होते. हे मंदिर उभारण्याशी भाजपचा काहीही संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. हे सगळं सुरू असतानाच बुधवारी रात्री अचानक येथील मोदींचा पुतळा हटवण्यात आला आहे.

पुण्यात मोदीभक्ताने उभारलं पंतप्रधान मोदींचं मंदिर, सेल्फीसाठी गर्दी

मोदींचा पुतळा हटवण्यात आल्याचं समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तिथं पोहोचले आणि त्यांनी उपरोधिक आंदोलन केलं. ‘एका माथेफिरू मोदीभक्तानं नरेंद्र मोदींचं मंदिर पुण्यात बांधलं. या मंदिराला भेट देऊन पेट्रोल, डिझेलचा नैवेद्य दाखवून साकडं मागण्यासाठी आज आम्ही सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते इथं आलो. मात्र आम्ही येण्यापूर्वीच मोदीजी इथून झोला उचलून निघून गेल्याचं निदर्शनास आलं.

वाचा: हे कसं झालं? अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ प्रकारामुळं अभ्यासकांनाही धक्का

या मंदिरात असलेली मोदींची मूर्ती आता गायब झाली आहे. कोणत्याही संकटाला घाबरून पळ काढण्याची मोदींची वृत्ती या मूर्तीच्याही अंगी आहे. तरीही या पवित्र ठिकाणी आम्ही प्रार्थना करतो आणि मोदीजी महागाई कमी करतील, युवकांना रोजगार देतील, कधीतरी खरं बोलतील अशी अपेक्षा व्यक्त करतो,’ अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

Source link

Aundh News UpdateNarendra Modi Statue RemovedNarendra Modi Temple News TodayPM Narendra Modi Temple in PunePune latest newspune news todayऔंधनरेंद्र मोदी मंदिरपुणे
Comments (0)
Add Comment