Xiaomi चा ३२ इंच, ४० इंच आणि ४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही लाँच, आता खरेदीवर मिळतायत खास ऑफर्स

नवी दिल्ली : Xiaomi ने भारतात तीन वेगवेगळ्या आकाराचे स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. यात लेटेस्ट पॅचवॉल, डॉल्बी अॅटमॉस ऑडिओ, व्हर्च्युअल एक्स आणि विविड पिक्चर इंजिन यासारख्या फीचर्सचा समावेश आहे. Xiaomi A Series Smart TV मध्ये लेटेस्ट Google TV सपोर्ट देखील देण्यात आला आहे. Xiaomi A सीरीज स्मार्ट टीव्हीची सुरुवातीची किंमत १४,९९९ रुपये आहे. या टीव्हींमध्ये मेटॅलिक डिझाइन, क्वाड कोअर ए३५ चिपसेट, १.५ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये २०० हून अधिक लाईव्ह चॅनेल्सचं लाईव्ह स्ट्रिमिंग शक्य आहे.

किंमतीचं काय?
Xiaomi A सीरीज स्मार्ट टीव्हीची सुरुवातीची किंमत १४,९९९ रुपये आहे. त्याच्या ३२ इंच स्मार्ट टिव्हीची ही किंमत आहे. तर ४० इंच स्मार्ट टीव्हीची किंमत २२,९९९ रुपये आहे. तसंच ४३ इंच स्मार्ट टीव्हीची किंमत २४,९९९ रुपये आहे. ग्राहक Xiaomi TV 32A १३,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतील. Mi Homes, Mi Homes, Flipkart आणि रिटेल स्टोअरमधून हा टीव्ही खरेदी करता येईल.

या टीव्हीचे फीचर्स

Xiaomi A सीरीजचा स्मार्ट टीव्ही मेटॅलिक डिझाईन आणि बेझललेस डिस्प्लेमध्ये सादर करण्यात आला आहे. हे टीव्ही क्वाड कोअर A35 चिपसेट सपोर्टसह सादर करण्यात आले आहेत. टीव्हीमध्ये 1.5 GB रॅम आणि 8 GB स्टोरेज सपोर्ट आहे. टीव्हीमध्ये ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0 कनेक्टिव्हिटी सपोर्ट देण्यात आला आहे. यात 2HDMI पोर्ट, 2USB पोर्ट सपोर्ट आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये क्विक म्यूट, क्विक वेक आणि क्विक सेटिंग सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या स्मार्ट टीव्हीमध्ये फुल एचडी प्लस रिझोल्यूशन डिस्प्ले सपोर्ट देण्यात आला आहे. टीव्ही 20W साउंड आउटपुटसह येतो. यामध्ये Xiaomi A सीरीज टीव्ही फीचरसह लेटेस्ट पॅचवॉल सपोर्ट देण्यात आला आहे.

वाचा : Smartphone Tips : पावसाळ्यात स्मार्टफोनचा स्पीकर बिघडला? घरच्या घरी करु शकता रिपेअर, फॉलो करा सोप्या टिप्स

Source link

smart tv offersxiaomi smart tv launchxiaomi smart tv offersशाओमी स्मार्ट टीव्ही ऑफर्सशाओमी ३२ इंच टीव्ही
Comments (0)
Add Comment