अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना उद्या २१ जुलैलाही सुट्टी

Maharashtra Rain Alert: मागच्या दोन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईसह राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यभरातील विविध ठिकाणाचे रस्ते जलमय झाले असून नद्या ओसंडून वाहत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पावसाचा आढावा घेत २० जुलैला शाळांना सुट्टी जाहीर केली होती.

आज दिवसभर राज्यभरात पावसाचा जोर कायम होता. शिवाय, हवामान खात्यानेही येत्या काही तासात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे, हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या अनुषंघाने ठाणे जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते १२ वीच्या सर्व माध्यमांच्या आणि मंडळाच्या शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शुक्रवार, २१ जुलै २०२३ रोजीही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

(वाचा : AI Free Training: केंद्र सरकारच्यावतीने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रातील ट्रेनिंग; आजच करा Free रजिस्ट्रेशन)

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पालकांची शाळा-कॉलेजांमध्ये ये-जा करण्याची गैरसोय होऊ नये. याचा विचार करत विद्यार्थी आणि पालकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात, उद्या म्हणजेच शुक्रवारीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शुक्रवारी २१ जुलै २०२३ रोजी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं बंद राहीतल, असे आदेश दिले आहेत.

(वाचा : यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांची महत्त्वपूर्ण घोषणा; काही तासांत जाहीर होणार CUET PG 2023 परीक्षेचा निकाल)

Source link

education newsEducation News Updatesmaharashtra rain newsmaharashtra rain updaterainfall forecastred alert in mumbaischool closed decesionschools holidayThane municipal corporationthane rain
Comments (0)
Add Comment