दिल्ली विद्यापीठाच्या प्रवेश अर्जांना सुरुवात;अभ्यासक्रम आणि कॉलेजांची २४ जुलैपर्यंत भरता येणार अर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Delhi University Admission: कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स एक्झामिनेशन (CUET) निकालानंतर, विद्यार्थ्यांनीआता दिल्ली विद्यापीठातील पदवीपूर्व अभ्यासक्रम आणि महाविद्यालयाच्या निवडीचे प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी DU ने प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू केला असून, विद्यार्थी आता अभ्यासक्रम आणि कॉलेजच्या निवडीचे प्राधान्यक्रम भरण्यास सुरुवात केली आहे.

सदर प्रक्रियेसाठी दिल्ली विद्यापीठाने २४ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. विद्यापीठाला १६ ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त प्रवेश घेऊन वर्ग सुरू करायचे आहेत, त्यामुळे यावर्षी प्रवेश प्रक्रियेसाठी केवळ एक आठवड्याचा अवधी दिला गेला असल्याची माहिती दिल्ली विद्यापीठाच्यावतीने स्पष्ट करण्यात आली आहे.

डीयूचे कुलसचिव प्रा. विकास गुप्ता यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमधील पूर परिस्थिती लक्षात घेता, प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याबरोबरच नोंदणीचा पहिला टप्पाही सुरू राहणार असलयाचे सांगण्यात आले आहे. विद्यापीठच्या वतीने दिल्या गेलेल्या वेळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक तपशील भरता येणार असून ज्यांनी आधीच भरलेली आहे त्यांना दुरुस्ती करता येणार आहे. मात्र विद्यार्थ्यांना नाव, फोटो आणि स्वाक्षरी बदलणे शक्य होणार नाही.

(वाचा : Education Loan: उच्च शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज घेताय..? त्याआधी हे नक्की वाचा)

२७ जुलैला कॉलेज पसंती क्रमांना लागणार कुलूप :

  • कॉमन सीट ऍलोकेशन सिस्टम (CSAS) २०२३ मध्ये DU ने विद्यार्थ्यांना त्यांचे कॉलेज आणि कोर्स प्राधान्ये भरण्यासाठी फक्त एक आठवडा दिला आहे.
  • २४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकतील, असे विद्यापीठाच्या वतीने जाहीर कार्नाय्त आले आहे.
  • विद्यार्थ्यांनी भरलेले प्राधान्ये क्रम २७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता लॉक होतील. सिम्युलेटेड यादी २९ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता काढली जाईल.
  • CUET स्कोअरच्या आधारे विद्यार्थ्यांना कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकणार आहे.
  • या रँकच्या आधारे, २९ जुलै सायंकाळी ५ ते ३० जुलै रात्री १२ वाजेपर्यंत, विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशाच्या संधी सुधारण्यासाठी त्यांचे कॉलेज-कोर्स संयोजनाचे प्राधान्य बदलण्याची संधी मिळेल.

पहिली यादी १ ऑगस्टला

  • पहिली जागा वाटप यादी १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध होईल.
  • या आधारे विद्यार्थ्यांना १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ४ ऑगस्ट रोजी दुपारी ४.५९ या वेळेत जागा स्वीकारता येणार आहेत.
  • कॉलेज विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज १ ते ५ ऑगस्ट रोजी दुपारी ४.५९ वाजेपर्यंत मंजूर करणार आहे.
  • ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.५९ वाजेपर्यंत शुल्क भरता येईल.
  • यानंतर ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता रिक्त जागांची माहिती संकेतस्थळावर अपलोड केली जाईल.
  • यानंतर ७ आणि ८ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना त्यांची पसंती क्रम बदलता येणार आहेत.
  • दुसरी जागा वाटप यादी १० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे.
  • विद्यार्थ्यांना १० ते १३ ऑगस्टपर्यंत जागा स्वीकारता येतील आणि महाविद्यालये १४ ऑगस्टपर्यंत प्रवेश मंजूर करतील.
  • तर, १५ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क भरता येईल

(वाचा : Top 10 BA Universities: बीएसाठी ही टॉप-१० विद्यापीठे आहेत, या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवण्याचे अनेकांचे स्वप्न)

Source link

admission updatescommon university entrance testCSASCUETdelhi universityDelhi University Admissiondelhi university newsDUEducationeducation news
Comments (0)
Add Comment