कोणाला मिळते शैक्षणिक कर्ज (Education Loan) ?
विद्यार्थी, पालक किंवा दोघेही (Joint/Combine Loan Application) स्वरूपात शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करु शकतात. या कर्ज प्रकारात तुम्हाला कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध होऊ शकते. परंतु, कर्ज घेण्यापूर्वी संबंधित बँक, व्याजदर, कर्ज परताव्याच्या नियम आणि अति याबद्दल सर्व माहिती कर्जाची प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी मिळवणे गरजेचे आहे. शिवाय, कोणती बँक किंवा कंपनी तुम्हाला सर्वात स्वस्त व्याजदरात कर्ज देत असेल, तर तुम्ही त्या बँकेतून किंवा संस्थेमधून कर्ज घेऊ शकता.
कर्ज घेण्यापूर्वी सर्व बँकांची माहिती घ्यावी.
सध्याच्या परिस्थितीबद्दल सांगायचे झाल्यास, अनेक बँकांमधून कमी व्याजदराने आणि चांगल्या ऑफर्सच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देतात. अशा परिस्थितीत तुम्ही येथून उच्च शिक्षणासाठी कर्ज देखील घेऊ शकता. शैक्षणिक कर्जावरील बँकेचा वार्षिक व्याजदर ८.५५ टक्क्यांपासून सुरू होतो. तर, अनेक बँकांमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता पाहून व्याजदरात आकर्षक सूटही दिली जाते. शिवाय, विद्यार्थीनींसाठी व्याजदरात सूटही उपलब्ध असते.
बारावीच्या मार्कशीटवर किती कर्ज उपलब्ध आहे?
बारावीत ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळालेले असतात अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सहज कर्ज उपलब्ध होते.बारावी गुणपत्रकाच्या आधारावर तुम्हाला साधारणतः २ लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते.
शैक्षणिक कर्ज का आवश्यक आहे?
उच्च शिक्षण हे दिवसेंदिवस महाग होत चालले आहे आणि सर्वच विद्यार्थी त्यासाठी पैसे स्वतः भरू शकत नाहीत. दुसरीकडे, जर तुम्हाला परदेशात शिक्षण घ्यायचे असेल तर पैसे उभे करणे अधिक कठीण होते कारण तेथे महाविद्यालयाची फी परदेशी चलनात भरावी लागते आणि राहणे, निवास, प्रवास आणि इतर गरजाही परदेशी चलनात भराव्या लागतात.
सिबिल स्कोअर महत्त्वाचा नाही…
तुम्हाला तुमच्या पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घ्यायचे असेल, पण तुमच्या सिबिल (CIBIL) स्कोअरबद्दल काळजी वाटत असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आता CIBIL स्कोर हा शैक्षणिक कर्जाच्या मंजुरीचा आधार असू शकत नाही. असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने एका विद्यार्थ्याच्या याचिकेवर सुनावणी केली. संबधित विद्यार्थ्याला खराब सिबिल स्कोअरमुळे शैक्षणिक कर्ज नाकारण्यात आले होते. त्यामुळे शैक्षणिक कर्जाबाबत थोडा मानवतावादी आधारावर निर्णय घ्या, असे न्यायालयाने बँकांना बजावले. विद्यार्थी हे आपल्या देशाचे भविष्य आहेत. अशा स्थितीत त्यांचा सिबिल स्कोअर खराब असल्याने त्यांचे अर्ज कर्ज फेटाळले जावे हे योग्य नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.