त्यामुळे आता सीबीएसई बोर्डाला आंतरराष्ट्रीय बोर्ड बनवण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाहीला सुरुवात करण्याच्या सूचना सीबीएससीच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती, माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.
(वाचा : CBSE Board: सीबीएसई शाळांमध्ये आता मिळणार भारतीय भाषांमध्येही शिक्षण; केंद्र शिक्षणमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा)
‘जी-२०’ परिषदेतंर्गत शिक्षण कार्य गटाच्या प्रतिनिधींची बैठक पुण्यात घेण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पुणे दौऱ्यावर असलेल्या प्रधान यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना, ‘जपानमधील सीबीएसईच्या शाळांमध्ये केवळ भारतीयच नव्हे; तर जपानी विद्यार्थी प्रवेश घेत असल्याचे समोर आले आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम, शिक्षण पद्धती, रचना आणि विशेषतः गणित आणि विज्ञानातील संकल्पना अधिक चांगल्या आहेत, असे परदेशातील पालकांचे म्हणणे आहे. याचमुळे ‘सीबीएसई’ला आंतरराष्ट्रीय बोर्ड म्हणून पुढे आणण्याचा विचार समोर आला असून याद्वारे भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या फ्रेमवर्कला जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न होईल.’ शिवाय, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे आगामी काळात देशाच्या शिक्षण क्षेत्रात मोठे बदल दिसून येतील. असेही प्रधान यांनी सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीय भाषेला महत्त्व
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे पुढील काळात देशाच्या शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होतील. जगभरातील राष्ट्रांकडून ’राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा’चे स्वागत केले जात आहे. चीन, जपान, जर्मनी, तैवान, कोरिया यांसारख्या राष्ट्रांमध्ये इंग्रजी भाषेला प्राधान्य दिले जात नाही, तर स्थानिक भाषांना महत्त्व दिले जाते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही भारतीय भाषांमधील शिक्षणालाच महत्त्व दिले जात आहे, असे धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.
(वाचा : Mumbai University: पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; पहिल्यांदा ई-समर्थ पोर्टलवरून प्रवेश)