जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली
तुम्ही जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून बीए ऑनर्सचाही अभ्यास करू शकता. या विद्यापीठात प्रवेश घेऊन तुम्ही अनेक विषयात बी.ए. इथे एकदा प्रवेश मिळाला तरच भविष्य घडेल. या विद्यापीठामधून शिक्षण घेणे हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न आहे.
- वेबसाईट : http://www.jnu.ac.in/main/
- फोटो सौजन्य : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ
जामिया मिलिया विद्यापीठ, नवी दिल्ली
जामिया मिलिया विद्यापीठामधून तुम्हाला विविध विषयांमध्ये बीए करण्याची संधी उपलब्ध आहे. या विद्यापीठाची फी देखील अगदी माफक आहे. यासोबतच इथे प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांना वसतिगृहाबरोबर इतर सुविधाही पुरविल्या जातात. CUET UG 2023 परीक्षांच्या गुणांच्या आधारे या विद्यापीठात प्रवेश दिला जाईल.
- वेबसाईट : https://www.jmi.ac.in/
- फोटो सौजन्य : जामिया मिलिया विद्यापीठ
जाधवपूर विद्यापीठ, पश्चिम बंगाल
पश्चिम बंगालमधील जाधवपूर विद्यापीठात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बीए विषयातली अनेक पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या विद्यापीठाच्या प्रवेश शुल्कासह इतर तपशील विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटला उपलब्ध आहे.
- वेबसाईट : https://jadavpuruniversity.in/
- फोटो सौजन्य : जाधवपूर विद्यापीठ
बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी
काशी हिंदू विश्वविद्यालय अशीही ओळख असणाऱ्या बनारस हिंदू विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असतात. सध्या येथे CUET मधील गुणांच्या आधारे प्रवेश अर्ज स्वीकारले जात आहेत. बनारस येथे स्थित असणारे हे एक केंद्रीय विद्यापीठ आहे. अधिक तपशील विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
- वेबसाईट : https://www.bhu.ac.in/Site/Home/1_2_16_Main-Site
- फोटो सौजन्य : बनारस हिंदू विद्यापीठ
मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन (MAHE), कर्नाटक
मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशनच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन विद्यार्थी येथे प्रवेश घेऊ शकतात. MAHE मध्येही CUET परीक्षेमधील गुणांच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे. या संस्थेमध्ये उपलब्ध असणाऱ्या जागांच्या तपशीलासह आणि इतर माहिती संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर तपासली जाऊ शकते.
- वेबसाईट : https://manipal.edu/mu.html
- फोटो सौजन्य : मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन
अमृता विश्वविद्यापीठम्, तामिळनाडू
विविध विषयांमधील बीए अभ्यासक्रमांबरोबर या विद्यापीठातील बीएससी अभ्यासक्रमांनाही चांगलीच मागणी आहे. या विद्यापीठात उपलब्ध जागांचा तपशील आणि इतर माहिती अमृता विश्वविद्यापीठम् यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. या विद्यापीठात प्रवेश घेणे हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते.
- वेबसाईट : https://www.amrita.edu/
- फोटो सौजन्य : अमृता विश्वविद्यापीठम्
अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, उत्तर प्रदेश
अलिगढ मुस्लीम विद्यापीठ हे देशातील सर्वोच्च विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ म्हणून ओळख असणारे विद्यापीठ होय. येथे विविध विषयांचे बीएसह अनेक अभ्यासक्रम चालवले जातात. येथे CUET स्कोअरच्या आधारे प्रवेश दिला जाईल. मात्र, या विद्यापीठात अल्पसंख्याकांसाठी ५० टक्के जागा राखीव आहेत.
- वेबसाईट : https://www.amu.ac.in/
- फोटो सौजन्य : अलीगढ मुस्लिम विद्यापीठ
हैद्राबाद विद्यापीठ, हैद्राबादतेलंगणा
तुम्ही हैद्राबाद विद्यापीठातून विविध अभ्यासक्रमांमध्ये बीएचा अभ्यासही करू शकता. जागांच्या तपशीलांची माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. इथे प्रवेश मिळाल्यास तुझे भविष्य चांगले होईल.
- वेबसाईट : https://uohyd.ac.in/
- फोटो सौजन्य : हैद्राबाद विद्यापीठ
दिल्ली विद्यापीठ, नवी दिल्ली
दिल्ली विद्यापीठातून तुम्ही विविध विषयांत बीएही करू शकता. येथे सुमारे ७०,००० जागा आहेत. येथे CUET स्कोअरच्या आधारे प्रवेश दिला जाईल. पहिली वाटप यादी १ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे.
- वेबसाईट : https://www.du.ac.in/
- फोटो सौजन्य : दिल्ली विद्यापीठ
कलकत्ता विद्यापीठ, कलकत्ता
कलकत्ता विद्यापीठातून विविध विषयांत बीए करण्याची समाधी उपलब्ध आहे. या विद्यापीठातील फी , उपलब्ध जागांचा तपशील, प्रवेश प्रक्रिया इत्यादींची माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
- वेबसाईट : https://www.caluniv.ac.in/
- फोटो सौजन्य : कलकत्ता विद्यापीठ