बीकॉम सत्र ५ परीक्षेचा निकाल जाहीर; २०२३ च्या उन्हाळी सत्राचे १२१ निकालांची घोषणा

Mumbai University Result 2023: मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या अंतिम वर्षाच्या मे २०२३ मध्ये संपन्न झालेल्या उन्हाळी सत्राच्या वाणिज्य विद्याशाखेच्या तृतीय वर्ष बीकॉम सत्र ५ या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

बीकॉम सत्र ५ च्या परीक्षेमध्ये एकूण १६७८२ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ३६ हजार १०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३४ हजार ०४० एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ (Appeared) झाले होते. तर २०६५ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत १५८९२ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. बीकॉम सत्र ५ चा निकाल ५१.३६ टक्के लागला आहे.

(वाचा : Mumbai University: पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; पहिल्यांदा ई-समर्थ पोर्टलवरून प्रवेश)

विद्यापीठाने आजपर्यंत २०२३ च्या उन्हाळी सत्राचे १२१ निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

आतापर्यंत १२१ निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठातर्फे उन्हाळी सत्राचे आतापर्यंत विद्यापीठाने १२१ निकाल जाहीर करण्यात आले आहेत. आज विद्यापीठाने तृतीय वर्ष बीकॉमच्या सत्र ५ चे निकाल जाहीर केले आहेत.

  • नोंदणीकृत विद्यार्थी : ३६ हजार १०५

  • उपस्थित विद्यार्थी : ३४ हजार ०४०

  • गैरहजर विद्यार्थी : २ हजार ०६५

  • उत्तीर्ण विद्यार्थी : १६ हजार ७८२

  • अनुत्तीर्ण विद्यार्थी : १५ हजार ८९२

  • उत्तीर्णतेची टक्केवारी : ५१.३६ टक्के

(वाचा : UPSC Recruitment 2023: यूपीएससीच्या विविध पदांसाठी ७१ जागांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी उरलेत काही दिवस)

Source link

bcomBcom SEM 5MU ResultsMU results 2023Mumbai University ExamMumbai University Result 2023mumresultsOdd Semesterresultsuniversity of mumbai
Comments (0)
Add Comment