मोबाईल टॉवर उभारण्यास स्थानिक नागरीकांची हरकत


(जळगाव जिल्हा संपादक-शैलेश चौधरी)

एरंडोल:येथील ब्राह्मण ओटा,मारवाडी गल्ली आणि पांडव वाडा परिसराच्या केंद्रस्थानी असलेल्या महाराष्ट्र ग्रामिण बँकेच्या इमारतीवर घरमालकाने 5G टॉवर उभारण्याचा घाट घातला आहे. घरमालक लोकप्रतिनीधी असल्याने आपल्या पदाचा गैरवापर करून स्थानिक प्रशासनावर दबाव आणत असल्याचे म्हटले आहे.भर वस्तीत असलेल्या ठिकाणी या टॉवरमुळे हवेत प्रसारीत होणाऱ्या घातक किरणांच्या माऱ्यांमुळे,लहान बालके,ज्येष्ठ नागरीक,पक्षी आणि प्राणि यांच्या जीवीताला धोका उत्पन्न होऊ शकतो.त्यामुळे दाटीवाटीच्या वस्तीतील या मोबाईल टॉवरवर आजुबाजुच्या नागरीकांनी तसेच परिसरातील नागरिकांनी हरकत घेतली असुन नगर पालिकेने दिलेल्या परवानग्या रद्द कराव्यात अन्यथा या बाबत उपोषणास बसण्याची तयारी असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे .या बाबत जिल्हाधिकारी जळगाव , नगर पालिका मुख्याधिकारी एरंडोल व तहसिलदार एरंडोल यांचे कडे तक्रारी अर्ज दिला आहे.

Comments (0)
Add Comment