नवी दिल्ली : iPhone 15 संबधित बरीच माहिती आता इंटरनेटवर लीक होत आहे. Apple चा लेटेस्ट आयफोन लाँच होण्यासाठी काही महिने शिल्लक असताना आणखी एका फीचरसंबधित माहिती समोर येत आहे. ज्यामुळे आता आयफोन्समध्ये बॅटरी बॅकअपचं टेन्शन अगदी कमी होणार आहे. कारण कंपनी आयफोन १५ मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट देऊ शकतो. यापूर्वी आयफोनमध्ये 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट होता, जो आता 40W वर अपग्रेड केला जाऊ शकतो. याशिवाय, हे वायरलेस चार्जिंग सपोर्टसह लाँच केले जाऊ शकते, परंतु यूएसबी टाइप सी पोर्ट असण्याबाबत अजून माहिती समोर आलेली नाही.
Apple iPhone वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आतापर्यंत, आयफोनमध्ये फास्ट चार्जिंग नसल्यामुळे फोनची बॅटरी लवकर संपणे आणि मग चार्ज होण्यास वेळ लागणे या समस्या येत होत्या. पण आता ही समस्या सुटणार आहे. कारण अॅपलकडून आयफोनमध्ये फास्ट चार्जिंगचा पर्याय दिला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार, Apple च्या आगामी iPhone 15 मध्ये 40W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.
फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार
सध्या, iPhone 14 मध्ये जास्तीत जास्त 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. पण आयफोन 15 सीरीजमध्ये चार्जिंगचा वेग 40W पर्यंत वाढवता येतो. टिपस्टर @RGcloudS नुसार, iPhone 15 सह 40W फास्ट चार्जिंगसह 20W वायरलेस चार्जिंग सपोर्ट प्रदान केला जाऊ शकतो. पण iPhone 15 मध्ये USB टाइप C चार्जिंग पोर्ट दिले जाणार नाही. यासाठी तुम्हाला iPhone 16 स्मार्टफोन लॉन्च होण्याची प्रतीक्षा करावी लागू शकते.

Apple इतरांपेक्षा मागेच
जरी अनेक तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की 40W चार्जिंग सपोर्ट 100W पासून खूप दूर आहे. कारण सध्या 80W ते 100W चार्जिंग सपोर्ट अगदी सामान्य झाले आहे. अनेक कंपन्या 120W सह 150W फास्ट चार्जिंग सपोर्ट देत आहेत. अशा परिस्थितीत, कदाचित 40W देणे म्हणजे तसं एकप्रकारे Apple मागेच आहे.
वाचा : Google Maps : ड्रायव्हिंग करताना गुगल मॅप वापरता? ‘हे’ पाच फीचर्स वापरा, पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल