कमला एकादशी व्रत तिथी आणि मुहूर्त
पद्मिनी एकादशी तिथी २८ जुलै रोजी दुपारी २.५२ पासून सुरू होईल आणि २९ जुलै रोजी दुपारी १.६ पर्यंत चालेल. अशा स्थितीत २९ जुलै रोजी पद्मिनी एकादशीचे व्रत पाळण्यात येणार आहे. त्याचबरोबर ३० तारखेला सूर्योदयापासून २ तासांच्या आत एकादशीचे व्रताचे पारण केले जाणार आहे.
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्याने पुरुषोत्तम मासातील कमला एकादशी व्रताचे आचरण शनिवार, २९ जुलै २०२३ रोजी करावे, असे सांगितले जाते.
एकादशी व्रत का करावे?
अधिक महिना श्रीविष्णूंचा प्रिय महिना असल्याचे सांगितले जाते. अधिक महिन्यातील एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना स्वर्ण दान आणि हजार यज्ञाचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. तसेच कमला एकादशीचे यशस्वी व्रताचरणामुळे मोक्षप्राप्ती होते. मनोकामना, प्रबळ इच्छा पूर्ण होतात. श्रीविष्णूंची कृपा आणि शुभाशिर्वाद प्राप्त होतात. श्रीविष्णूंसह महालक्ष्मी देवीची कृपादृष्टीही राहते. त्यामुळे श्रीविष्णूंना प्रसन्न करण्यासाठी पुरुषोत्तम एकादशीचे व्रत आवर्जुन आचरावे. अधिक महिना तीन वर्षातून एकदा येत असल्यामुळे अशी सुवर्ण संधी पुन्हा पुन्हा उपलब्ध होत नाही. त्यामुळे पुण्यप्राप्तीचे लाभ मिळण्यासाठी कमला एकादशी व्रत करावे, असे सांगितले जाते.
एकादशी व्रताची पूजाविधी
कमला एकदशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी पहाटे नित्यकर्म आटोपल्यानंतर कमला एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. यावेळी पिवळ्या रंगाच्या वस्त्राचा आवर्जुन वापर करावा. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. नैवेद्यामध्ये पिवळ्या रंगाची मिठाई, खीर यांचा समावेश असल्यास उत्तम. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू चालीसा, विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे.
कमला एकादशी व्रताचे महत्व
अधिक महिना श्रीविष्णूंचा प्रिय महिना असल्याचे सांगितले जाते. पुरुषोत्तम एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना स्वर्ण दान आणि हजार यज्ञाचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. तसेच पुरुषोत्तम एकादशीचे यशस्वी व्रताचरणामुळे मोक्षप्राप्ती होते. मनोकामना, प्रबळ इच्छा पूर्ण होतात. श्रीविष्णूंची कृपा आणि शुभाशिर्वाद प्राप्त होतात. श्रीविष्णूंसह महालक्ष्मी देवीची कृपादृष्टीही राहते. त्यामुळे श्रीविष्णूंना प्रसन्न करण्यासाठी पुरुषोत्तम एकादशीचे व्रत आवर्जुन आचरावे. पुरुषोत्तम महिना तीन वर्षातून एकदा येत असल्यामुळे अशी सुवर्ण संधी पुन्हा पुन्हा उपलब्ध होत नाही. त्यामुळे पुण्यप्राप्तीचे लाभ मिळण्यासाठी पुरुषोत्तम एकादशी व्रत करावे, असे सांगितले जाते.