अतिवृष्टीमुळे २० जुलैच्या रद्द झालेल्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर; या दिवशी होणार परीक्षा

Mumbai University Exam Reschedule 2023: मुंबईसह कोकणातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची हजेरी असून १९, २० आणि २१ जुलैला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्याना जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पावसाचा आढावा घेत, शाळा-कॉलेजांना सुट्ट्या देण्याचे आदेश दिले होते. तर, मुंबई विद्यापीठानेही नियोजित परीक्षा पुढे ढकलणार असल्याचे जाहीर केले होते.मुंबई, ठाणे, पालघर , रायगड , रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या दिवसांमध्ये जाहल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या शासन आदेशानुसार व रायगड, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार मुंबई विद्यापीठाच्या दिनांक २० जुलै २०२३ च्या सर्व ९ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यातील तृतीय वर्ष बीए सत्र ५ च्या परीक्षा दिनांक २६ जुलै २०२३ रोजी घेण्यात येणार आहेत.या परीक्षा त्याच परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार असल्याचे मुंबई विद्यापीठाने जाहीर केले आहे.

(वाचा : Mumbai University Result 2023: बीकॉम सत्र ५ परीक्षेचा निकाल जाहीर; २०२३ च्या उन्हाळी सत्राचे १२१ निकालांची घोषणा)

या सोबतच, एमएससी (फायनान्स) सत्र २, एमएससी व एमएमसी (रिसर्च) सत्र २, एमएससी आयटी व सीएस (६०: ४० व ७५:२५), एमएससी गणित (८०:२०) सत्र २, एमएससी व एमएमसी (रिसर्च) सत्र ३, एमसीए सत्र १, एमए (ऑनर्स) आणि एम कॉम ( ६०:४०) सत्र ४ या अभ्यासक्रमाच्या परीक्षा दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी घेण्यात येणार असल्याचे वियापीठाच्यावतीने परीक्षा विभागाने घोषित केले आहे. या परीक्षा त्याच परीक्षा केंद्रावर घेण्यात येतील असल्याची माहितीही विद्यापीठाच्या वतीने परिपत्रकाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तृतीय वर्ष बीए सत्र ५ च्या २६ जुलैच्या परीक्षा २८ जुलै रोजी होणार असून, तृतीय वर्ष बीए सत्र ५ मधील प्रोग्राम क्रमांक 3A00135 aani 3A00145 च्या ण २६ जुलैला २०२३ ला नियोजित सर्व परीक्षा काही तांत्रिक कारणास्तव दिनांक २८ जुलै रोजी होणार आहेत. अशा आशयाचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी प्रसिद्ध केले आहे.

(वाचा : Mumbai University: पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; पहिल्यांदा ई-समर्थ पोर्टलवरून प्रवेश)

Source link

examinationheavy rainIdolMU Exam Reschedulemu idolMumbai University ExamMumbai University Exam Reschedule 2023Mumbai University Exam UpdatesMumbai University Studentsrevised timetable
Comments (0)
Add Comment