(जळगाव जिल्हा संपादक शैलेश चौधरी)
एरंडोल:तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना/खातेदारांना एरंडोल तहसिलदार सुचिता चव्हाण यांनी आवाहन केले आहे की महाराष्ट्र शासनातर्फे ई-पीकपाहणी या मोबाईल अॅपचे लोकार्पण केले गेले असल्याने आता शेतकरी बांधवांना मोबाईल वरुनच करता येणार आहे.स्वत:च्या शेतात असलेली पीके सातबार्यावर नोंदवीता येणार असून सदर पीक पाहणी ही खालील प्रमाणे नोंदविता येणार आहे.मोबाईलवर ई -पीक पाहणी अॅप डाऊनलोड करावा , अॅपमध्ये आपली नोंदणी करावी,आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओ.टी.पी. कायम स्वरुपी जतन करुन ठेवणे आवश्यक आहे,आपले खाते क्रमांक टाकून संपूर्ण माहिती भरावी,शेतातील पिकांचा फोटो अपलोड करुन संपूर्ण माहिती तपासून अपलोड करावी तसेच आपली ई-पीक पाहणी ही १५ ऑगष्ट २०२१ ते १५ सप्टेंबर २०२१ या कालावधीतच भरणे आवश्क आहे.
सदरील ई -पिक पाहणी सर्व शेतकरी बंधूंनी भरुन घ्यावी . मुदतीनंतर पिक पाहणी भरता येणार नाही याची नोंद घ्यावी. या बाबत काही अडचण असल्यास संबंधीत गावाचे तलाठी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.