नवी दिल्ली : Online Fraud Complaint : वाढत्या डिजीटलायजेशनमुळे आजकाल सायबर गुन्हेही वाढले आहेत. त्यामुळेच ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. एकीकडे ऑनलाईन व्यवहार जसा सामान्या झाला आहे, तशाच ऑनलाईन फसवणुकीच्या घटना सामान्य झाल्या आहेत. दररोज कोणीतरी ऑनलाइन फसवणुकीचा बळी ठरत असतं. मात्र, फार कमी लोकांना माहिती आहे की, जर ते ऑनलाइन फसवणुकीचे बळी ठरले, तर त्याबद्दल तक्रार कशी करायची? तर अशाप्रकारच्या गुन्ह्यांची तक्रार पोलीस ठाण्यापेक्षा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर करता येईल. हे विशेषतः सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांची तक्रार करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
जर समजा तुमच्यासोबत झालेल्या फसवणुकीवर तात्काळ कारवाई करून प्रकरण निकाली काढावे असे वाटत असेल, तर तुम्ही घटनेच्या २४ तासांच्या आत तक्रार नोंदवणं गरजेचं आहे. जेणेकरुन पोलिसांना तात्काळ कारवाई करता येईल. अशा परिस्थितीत तुमच्यासोबत झालेल्या फसवणुकीचे पैसे तुम्हाला लगेच मिळण्याची दाट शक्यता आहे.
ऑनलाइन फसवणुकीची तक्रार कशी करावी?
जर समजा तुमच्यासोबत झालेल्या फसवणुकीवर तात्काळ कारवाई करून प्रकरण निकाली काढावे असे वाटत असेल, तर तुम्ही घटनेच्या २४ तासांच्या आत तक्रार नोंदवणं गरजेचं आहे. जेणेकरुन पोलिसांना तात्काळ कारवाई करता येईल. अशा परिस्थितीत तुमच्यासोबत झालेल्या फसवणुकीचे पैसे तुम्हाला लगेच मिळण्याची दाट शक्यता आहे.
ऑनलाइन फसवणुकीची तक्रार कशी करावी?
- सर्वप्रथम https://cybercrime.gov.in. पोर्टलवर जा.
- त्यानंतर होम पेजला भेट द्या आणि तक्रार नोंदवा ऑप्शनमध्ये जाऊन तक्रार नोंदवा
- त्यानंतर टर्म आणि कंडिशनवर क्लिक करा आणि पुढील मेन पेजवर जा.
- यानंतर सायबर क्राईम रिपोर्ट बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर नाव, ईमेल आणि फोन नंबर टाकून लॉगिन करा.
- यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी टाका.
- त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
- यानंतर, तुमच्यासोबत झालेल्या फसवणुकीची तक्रार नोंदवा.
- त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
- यानंतर एक नवीन पेज उघडेल, जिथे गुन्ह्याचा उर्वरित तपशील द्यावा लागेल. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
- पुढील पेजवर, संभाव्य संशयिताची माहिती देऊन, सबमिट बटणावर क्लिक करा.
- यानंतर तक्रार नोंदवल्याचा मेसेज येईल आणि पोलिसांकडून कारवाई सुरु होईल.
टीप – जर तुम्ही ऑनलाइन फसवणूक, लॉटरी घोटाळा, एटीएम फसवणूक, बनावट कॉल आणि इंटरनेट बँकिंग फसवणुकीची तक्रार दाखल केली तर पूर्ण पुरावे द्यावे लागतील.
वाचा : Gpay वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! आता पिन न टाकता ही करता येणार UPI पेमेंट