पुणे दि १६ :-ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरस्वती पाटील यांचा ९० वा आणि त्यांचे सुपुत्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते जयंता पाटील यांनी आपला ५० वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा करून नव्या पिढीला आदर्श घालून दिला.वाढदिवसाच्या निमित्ताने पाटील कुटुंबियांनी १५० फळझाडे व औषधी वृक्षांची लागवड शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते करून त्याचे जतन करण्याचा संकल्प जाहीर केला.मातृशक्तीचा सन्मान करताना पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या पाटील कुटुंबियांच्या अभिनव
उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्तिगत आनंद साजरा करताना सामाजिक जाणिवेतून वृक्षारोपणाचा पाटील कुटुंबियांचा उपक्रम अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार विद्यार्थीप्रिय शिक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी यावेळी काढले.