ज्यांनी बसवला, त्यांनीच हटवला मोदींचा त्या मंदिरातील पुतळा; ‘हे’ आहे कारण

हायलाइट्स:

  • पुण्यातील मंदिरातील मोदींचा पुतळा रातोरात गायब
  • मंदिर उभारणाऱ्यांनीच हटवला मोदींचा पुतळा
  • मोदींच्या मंदिरावरून पडद्यामागे घडलं बरंच काही!

पुणे: औंध इथं भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यानं उभारलेल्या मंदिरातील मोदींचा पुतळा रातोरात हटवण्यात आल्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. हा पुतळा नेमका कोणी हटवला याबाबतची माहिती पुढं आली आहे. मंदिर उभारणाऱ्या आणि त्यात मोदींच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करणाऱ्या पदाधिकाऱ्यानंच हा पुतळा हटवल्याचं समोर आलं आहे. (PM Narendra Modi Temple in Pune)

वाचा: बाळासाहेबांना अभिवादन करताना नारायण राणे भावूक, म्हणाले…

औंध येथील मयूर मुंडे व त्याच्या सहकाऱ्यांनी परिहार चौकात मंदिर उभारलं होतं. त्यात मोदींचा अर्धपुतळा बसवण्यात आला होता. या माध्यमातून मोदींना एक प्रकारे देवाचं स्थान देण्यात आलं होतं. मयूर मुंडे यांनी या मंदिरासाठी सुमारे दीड ते दोन लाख रुपये खर्च केले होते. हे मंदिर पाहण्यासाठी लोक गर्दी करत होते. तिथं मोदींच्या अर्धपुतळ्यासोबत सेल्फी काढत होते. मात्र, विरोधकांनी या प्रकारावर टीका केली होती. एकीकडं मोदी सरकार योजनांना दिली गेलेली माजी पंतप्रधानांची नावं बदलत असताना त्यांचे स्वत:चे कार्यकर्ते नेत्याचं मंदिर बांधत आहे. ही अनुनयाची हद्द आहे,’ अशी टीका काँग्रेसनं केली होती. अर्थात, भाजपचा मंदिराशी संबंध नसल्याचं पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी स्पष्ट केलं होतं. त्यातच बुधवारी रात्री हा पुतळा तिथून गायब झाला व मंदिरालाही भगव्या कपड्यानं झाकण्यात आलं. त्यामुळं वेगळीच चर्चा रंगली होती. मयूर मुंडे यांनी स्वत: हा पुतळा हटविला असून त्याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पुण्यात मोदीभक्ताने उभारलं पंतप्रधान मोदींचं मंदिर, सेल्फीसाठी गर्दी

वाचा:मांजरीसारखं मला आडवं येऊ नका; नारायण राणेंचा कडक इशारा

‘पंतप्रधान मोदी यांच्याबद्दलचा आदर व प्रेमापोटी आम्ही हे मंदिर उभारलं होतं. त्यामागची भावना चांगली होती. मात्र, काल आम्हाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा फोन आला. जिवंत व्यक्तीचं मंदिर बांधून पूजा करणं हे पक्षाच्या तत्वात बसत नाही, असं आम्हाला सांगितलं गेलं. आपल्या भावना रस्त्यावर मंदिर बांधून जाहिरातरित्या व्यक्त न करता, त्या मनातच ठेवल्या जाव्यात. त्यानुसार कृती आणि कार्य करावं, असं सांगण्यात आलं. त्यामुळं आम्ही मंदिरातील पुतळा हलवला आहे,’ असं मयूर मुंडे म्हणाले.

Source link

Mayur MundeNarendra Modi Temple News UpdatePM Narendra Modi Temple in Puneनरेंद्र मोदी मंदिरपुणेमयूर मुंडे
Comments (0)
Add Comment