बीएससी कम्युटर सायन्स सत्र ६ च्या परीक्षेमध्ये एकूण १ हजार ७४१ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला २ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ हजार ८८५ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ (Appeared) झाले होते. तर ३२ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच, या परीक्षेत ६४८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. बीएससी कम्प्युटर सायन्स सत्र ६ चा निकाल ७१.८८ टक्के लागला आहे.
(वाचा : MU Exam 2023: अतिवृष्टीमुळे २० जुलैच्या रद्द झालेल्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर; या दिवशी होणार परीक्षा)
विद्यापीठाने आजपर्यंत २०२३ च्या उन्हाळी सत्राचे १२८ निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
आतापर्यंत १२८ निकाल जाहीर
मुंबई विद्यापीठातर्फे उन्हाळी सत्राचे आतापर्यंत विद्यापीठाने १२८ निकाल जाहीर करण्यात आले आहेत. आज विद्यापीठाने तृतीय वर्ष बीएससी कम्प्युटर सायन्स सत्र ६ चे निकाल जाहीर केले आहेत.
नोंदणीकृत विद्यार्थी : २ हजार ९१७
उपस्थित विद्यार्थी : २ हजार ८८५
गैरहजर विद्यार्थी : २ हजार ०६५
उत्तीर्ण विद्यार्थी : ३२ विद्यार्थी
अनुत्तीर्ण विद्यार्थी : ६८४ विद्यार्थी
उत्तीर्णतेची टक्केवारी : ७१.८८ टक्के
(वाचा : Mumbai University Result 2023: बीकॉम सत्र ५ परीक्षेचा निकाल जाहीर; २०२३ च्या उन्हाळी सत्राचे १२१ निकालांची घोषणा)