अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर (Post Graduation) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी दरवर्षी GATE परीक्षा घेतली जाते. केंद्र सरकारचे विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील अनेक उपक्रमांसाठी GATE परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाते.
(वाचा : IIT Mumbai Recruitment: आयआयटी मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या तपशील आणि अर्ज करण्याची पद्धत)
सर्वसामान्यपणे, जनरल अँटिट्यूड अंतर्गत परीक्षेच्या एकूण गुणांपैकी १५ टक्के प्रश्न विचारले जातात तर, उर्वरित ८५ टक्के परीक्षा अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न गेटमध्ये विचारले जात. गेल्या वर्षी या परीक्षेच्या नोंदणीसाठी ३० ऑगस्ट ते ७ ऑक्टोबर २०२२ ही मुदत देण्यात आली होती. ९ जानेवारी २०२३ रोजी उमेदवारांना प्रवेशपत्र देण्यात आल्यानंतर, ४, ५, ११ आणि १२ फेब्रुवारीला २०२३ ला परीक्षा घेण्यात आली होती. १६ मार्च २०२३ ला या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता.
उमेदवाराने दिलेल्या GATE परीक्षेचे गुण सामान्यतः ३ वर्ष कालावधीसाठी ग्राह्य (वैध) मानले जातात. या काळात कोणताही विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतो. तथापि, तो आपला गुण वाढवण्यासाठी अनेक वेळा ही परीक्षा देऊ शकतो. GATE 2024 परीक्षेत बसण्यासाठी कोणतेही किमान गुण/टक्केवारी आवश्यक नाही. या परीक्षेसाठी आणि निकालानंतर विविध संस्थांमध्ये प्रवेशाचे निकष वेगवेगळे असतात.
अशा प्रकारे तुम्ही GATE 2024 साठी अर्ज करू शकता
- सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
- त्यानंतर नोंदणी लिंकवर क्लिक करा.
- तुमचा आयडी आणि पासवर्ड तयार करा.
- त्यानंतर फॉर्म भरा आणि सबमिट करा.
- फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.
(वाचा : MEA Internship: देशाच्या परराष्ट्र मंत्रालयात इंटर्नशिप करायची आहे..? मग हे नक्की वाचा)