Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 26 Jul 2023, 3:27 pm
Grah Rashi Parivartan August 2023 In Marathi: ऑगस्ट महिन्यात सूर्य आणि शुक्र व्यतिरिक्त बुध आणि मंगळाचे संक्रमण होणार आहे. शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल आणि नंतर या राशीत उदयास येईल. सूर्य स्वतःच्या सिंह राशीत येऊन बुधादित्य नावाचा राजयोग तयार करेल आणि बुध येथे आधीच उपस्थित असेल. दुसरीकडे, क्रूर ग्रह मंगळ सिंह राशीतून कन्या राशीत जाईल. सिंह राशीमध्ये बुधाची प्रतिगामी गती सुरू होईल. अशाप्रकारे, येणारा महिना ग्रहांच्या स्थितीत मोठा बदलाचा मानल जातो आहे. हा बदल ५ राशींसाठी महत्वाचा आणि शुभ ठरेल, जाणून घेऊया या ५ राशी कोणत्या आहेत.