एरंडोल येथे शेतकरी बांधवांना देण्यात आले पीक पाहणी अँप चे प्रशिक्षण

(जळगाव जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)

एरंडोल:तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना/खातेदारांना एरंडोल तहसिलदार सुचिता चव्हाण यांनी आवाहन केले होते त्या आवाहनाआधारे येथील तलाठी कार्यालयात शेतकरी बांधवांना पीक पाहणी अँप चे प्रशिक्षण देण्यात आले.
दि.१९ऑगस्ट२०२१ रोजी शहरातील मेनरोडवरील चावडी येथे तलाठी सलमान तडवी व शहर कोतवाल पंकज भोई यांनी आपल्या मोबाईल वरुन पीकपाहणी कशी करता येणार व स्वत:च्या शेतात असलेली पीके सातबार्यावर कशी नोंदविता येणार .. या बाबत चे प्रशिक्षण उपस्थित शेतकर्यांना दिले.
याप्रसंगी मदन भावसार,बापु पाटील,प्रकाश पाटील,शिवाजी पाटील,सुनिल गुजर,विजय गुजर आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.
काही अडचण असल्यास संबंधीत गावांचे तलाठी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन ही एरंडोल शहर तलाठी सलमान तडवी यांनी यावेळी केले.

Comments (0)
Add Comment