आयआयटी कौन्सिलच्या बैठकीत झालेल्या चर्चेदरम्यान एक मह्त्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्राध्यापक एस सुदर्शन यांनी माध्यमांशी बोलताना दिली. बीटेक कोर्सदरम्यान कमी कामगिरी असणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर पडण्यासाठी हा पर्याय उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे विद्यार्थ्याला सन्मानपूर्वक बाहेर पडता यावे आणि केलेल्या अभ्यासाचा फायदा व्हावा हा यामागचा उद्देशानेच हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत, आयआयटी, मुंबईने ४ वर्षांचा बीटेक प्रोग्राम पूर्ण करू शकत नसलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामधून लवकर बाहेर पडण्याचा पर्याय दिला आहे. या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या प्लेसमेंटमध्येही सहभागी होता येणार आहे.
(वाचा : IIT Mumbai Recruitment: आयआयटी मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या तपशील आणि अर्ज करण्याची पद्धत)
या निर्णयापूर्वी कमी गुण मिळाल्यानंतर किंवा परफॉर्मन्स उत्तम न केल्यास काही विद्यार्थी हा कोर्स अपूर्ण ठेवत असायचे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना तीन वर्षांची अभियांत्रिकी क्षेत्रीतील बीएससी पदवी मिळवून देणे हा या मागचा सकारात्मक हेतू आहे.
जाणून घ्या आयआयटी मुंबईची अभियांत्रिकी बीएससीची नवी पद्धत
जे विद्यार्थी चार वर्षांचा बी.टेक कोर्स पूर्ण करू शकत नाहीत किंवा कोर्स सोडू इच्छितात अशा विद्यार्थ्यांना आयआयटीकडून अभियांत्रिकी मधील बीएससी पदवी देण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र, यासाठी बीटेकचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. अशा विद्यार्थ्यांना ड्रॉप-आउट हे लेबल देण्याऐवजी बाहेर पडत असताना केलेल्या कोर्सचा फायदा व्हावा म्हणून बीएससी पदवीधर असे सर्टिफिकेट दिले जाणार आहे.
बी-टेक ३ वर्षात सोडल्यावर BSc ची पदवी मिळेल
BTech अभ्यासक्रमाच्या ड्रॉपआऊट पर्यायावर, प्राध्यापक महाजन म्हणाले, “विद्यार्थ्यांना B.Sc पदवी मिळविण्यासाठी तीन वर्षांत १६० क्रेडिट्स पूर्ण करावे लागतात. जर एखादा विद्यार्थी त्याच्या मुख्य विषयात किमान ३० क्रेडिट्स पूर्ण करू शकला, तर त्याला त्या विषयात विशेष पदवी मिळेल. ज्या विद्यार्थ्याने बाहेर पडण्याचा पर्याय निवडला असेल त्याला एकूण १६० क्रेडिट्स मिळाले ज्यापैकी ३० संगणक शास्त्रातील आहेत, तर विद्यार्थ्याला संगणक शास्त्रात B.Sc पदवी मिळेल.
(वाचा : MEA Internship: देशाच्या परराष्ट्र मंत्रालयात इंटर्नशिप करायची आहे..? मग हे नक्की वाचा)