Samsung Galaxy Z Flip 5 चे फीचर्स
तर या फोनला Android 13 सपोर्ट देण्यात आला आहे. जो OneUI 5.1.1 वर आधारित आहे. यात ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस डायनॅमिक एमोलेड 2X इन्फिनिटी फ्लेक्स इनर डिस्प्ले आहे. याचे पिक्सेल रिझोल्यूशन 1080×2640 आहे. यात 120Hz अॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट आहे. फ्लिप फोन असल्यामुळे याला बाहेरही छोटा डिस्प्ले असून या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर हा ३.४ इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. याचे पिक्सेल रिझोल्यूशन 720×748 आहे. त्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. यावर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे.
हा फोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 8 जीबी रॅम देण्यात आला आहे. तसेच 512 GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये ड्युअल रेअर कॅमेरा सेटअप आहे. त्याचा पहिला सेन्सर १२ मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. त्याच वेळी, दुसरा १२ मेगापिक्सेलचा कॅमेरा जो वाइड-अँगल सेन्सर आहे. फोनमध्ये १० मेगापिक्सलचा सेल्फी सेंसर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, ब्लूटूथ 5.3, GPS/A-GPS, NFC आणि USB टाइप-C पोर्ट आहे. फोनला धुळ-पाणी यापासून वाचवण्यासाठी IPX8 रेटिंग देण्यात आली आहे. यामध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. बॅटरी ही 3700 mAh आहे जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन फास्ट वायरलेस चार्जिंग 2.0 आणि वायरलेस पॉवरशेअरला देखील सपोर्ट करतो. फोनचं वजन १८७ ग्रॅम असून ब्लू, क्रीम, ग्रेफाइट, ग्रे, ग्रीन, लॅव्हेंडर, मिंट आणि यलो या शेड्समध्ये फोन उपलब्ध करण्यात आला आहे.
वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन