अरेरे! आजारी भावाला भेटायला निघालेल्या महिलेचा शिवशाही बसच्या चाकाखाली सापडून मृत्यू

हायलाइट्स:

  • पुण्यातील एसटी बस स्टँडमध्ये शिवशाही बसखाली महिलेचा मृत्यू
  • आजारी भावाला भेटण्यासाठी सोलापूरहून आली होती महिला
  • बस चालकाला अटक; गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी । पुणे

पुण्यातील भावाला भेटण्यासाठी आलेली ६० वर्षीय महिला शिवशाही बसच्या पाठीमागील चाकाखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना पुणे स्टेशन एसटी स्थानकात बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात एसटी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.

गेंदाबाई ज्ञानोबा चौगुले (वय ६०, रा. केगाव, सोलापुर) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी राणी इगवे (वय ३५) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार बस चालक भानुदास वाडकर (रा. लातूर) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेंदाबाई यांचा भाऊ मोशीमध्ये राहतो. तो काही दिवसांपासून आजारी असल्याने त्या भावाला भेटण्यासाठी पुण्याला आल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी राणी व काही नातेवाईक होते. सोलापूर येथून बुधवारी सकाळी त्या पुण्याला येण्यासाठी बसमध्ये बसल्या.

वाचा:आशा बुचके भाजपमध्ये; फडणवीस म्हणाले, ही २०२४ च्या विजयाची नांदी

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्या पुणे स्टेशन येथील एसटी स्थानकात उतरल्या. त्यानंतर त्यांना मोशी येथे भावाकडे जायचे होते. एसटीतून उतरल्यानंतर गेंदाबाई एसटी स्थानकातील स्वच्छतागृहात गेल्या. त्या ठिकाणाहून परत येत असताना एक भरधाव शिवशाही बस स्थानकात आली. गेंदाबाई या शिवशाही बसच्या पाठीमागून एसटी स्थानकात बसलेल्या मुलीकडे जात होत्या. तेवढ्यात भरधाव पुढे गेलेली शिवशाही बस अचानक तितक्‍याच वेगात पाठीमागे आली. त्यावेळी गेंदाबाई या बसच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी बस चालकास अटक करण्यात आली आहे.

वाचा: हे कसं झालं? अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ प्रकारामुळं अभ्यासकांनाही धक्का

Source link

Pune MSRTC StandPune Railway StationPune Shivshahi Bus Accident UpdateShivshahi bus Accident at Pune ST Standwoman run over by shivshahi bus at pune ST Standपुणेपुणे एसटी स्टँडशिवशाही बसने महिलेला चिरडले
Comments (0)
Add Comment