भारत सरकारच्या ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’कडून तब्बल १३२४ जागांसाठी मेगाभरती; लगेच करा अर्ज

SSC Junior Engineer Recruitment 2023: भारत सरकारच्या (Government of India) स्टाफ सिलेक्शन कमिशनने (Staff Selection Commission) ने सिव्हिल, मॅकेनिकल आणि इलेक्ट्रिकल विभागाच्या ज्युनिअर इंजिनिअर पदासाठी पदभरती जाहीर केली असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांना Staff Selection Commission च्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

तब्बल १३२४ जागांच्या भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनने ही भरती जाहीर केली असून, उमेदवारांना SSC च्या अधिकृत वेबसाइटवर हा अर्ज भरता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ ऑगस्ट २०२३ रात्री ११ वाजेपर्यंत असणार आहे. तर, उमेदवारांना १७ आणि १८ ऑगस्ट२०२३ या दिवसांत आपल्या अर्जांमध्ये बदल किंवा चुका दुरुस्त करता येणार आहेत.

तर, या जागांसाठी संगणक-आधारित परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होणार आहे.

SSC ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल, मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल) भरतीचे वेळापत्रक :

  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: १६ ऑगस्ट २०२३, रात्री ११ वाजेपर्यंत
  • ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख: १६ ऑगस्ट २०२३, रात्री ११ वाजेपर्यंत
  • ऑनलाइन अर्ज फॉर्म दुरुस्ती आणि बदल: १७ आणि १८ ऑगस्ट२०२३
  • संगणक-आधारित परीक्षेची तारीख: ऑक्टोबर २०२३

पदभरतीचा तपशील :

यामध्ये कनिष्ठ अभियंता ( सिव्हील ) , कनिष्ठ अभियंता ( मेकॅनिकल) , कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) , कनिष्ठ अभियंता ( इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल ) अशा एकूण १ हजार ३२४ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता :

वरील सर्व पदांकरिता विविध पदानुसार उमेदवार हे स्थापत्य / यांत्रिकी / इलेक्ट्रिकल या या इंजिनिअरिंग शाखांमधील पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. याबद्दलची अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

वयोमर्यादा :

० सदर पदाकरिता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी वय ३० ते ३२ वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहे .
० यामध्ये अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्ष सूट देनाय्त आली आहे.
० तर, इतर मागासवर्गीय उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्षाची अतिरिक्त सूट देण्यात येणार आहे.

SSC ज्युनिअर इंजिनिअर पद भरतीसाठी परीक्षा शुल्क :

  • सर्वसाधारण प्रवर्ग (General Category) आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
  • महिला, ST/ST/PWD/ माजी सैनिक यांना भरती परीक्षेसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

असा करा अर्ज :

१. SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२. पोर्टलवर नोंदणी करा आणि लॉग इन करा,
३. त्यानंतर ‘मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) कर्मचारी परीक्षा २०२३ मध्ये ‘Apply’ वर क्लिक करा.
४. विचारलेल्या आवश्यक माहितीसह फॉर्म भरा.
५. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून परीक्षा शुल्क भरा.
६. पूर्ण भरून झाल्यानंतर अर्ज पुन्हा व्यवस्थित तपासून सबमिट करा.

Source link

Government jobgovernment of indiajob for engineersjunior engineersarkari naukariSSC RecruitmentSSC Recruitment 2023staff selection Commissionभारत सरकार
Comments (0)
Add Comment